‘सारस न्याहळा अन्‌ घटस्फोट टाळा‘..!

सामाजिक प्रतिष्ठा व व्यक्तिगत अहंकाराने जगभरात शेकडो जोडीदारांचे संसार उद्‌ध्वस्त होत असताना, वैवाहिक निष्ठा हेच ‘जीवन‘ मानून जगणारा ‘सारस‘ हा एकमेव सजीव..! जोडीनेच राहणार, एक खाली मान घालून अन्न खात असेल तर दुसरा वर मान करून टेहाळणी करणार..! अंडी उबवण्याचा अधिकार फक्‍त मादीचाच या निसर्ग नियमालाही छेद देत अंडे उबणारा नर पक्षी ‘सारस‘ हा एक चमत्कारच..! 
आयुष्यभर प्रत्येक क्षण जोडीदारासोबच जगताना एकाचा प्राण गेला तर दुसरा अन्नत्याग करून आत्महत्या करणारा ‘सारस‘..! या देखण्या व रुबाबदार पक्षाची जोडीदारासोबतची वैवाहिक निष्ठा व प्रेम म्हणजे आजच्या ‘लिव्ह अँड रिलेशन‘च्या युगात डोळ्यात अंजन घालणारीच मानावी लागेल.

‘सारस‘च्या या वैशिष्ट्यामुळेच राजस्थान व दक्षिण भारतात वैवाहिक वाद होणाऱ्या मानवी जोडप्यांना सारस पाहायला पाठवण्याची पद्धत रूढ आहे.
गोंदीयापासून दहा किलोमीटरवर परसवाडा या पारंपरिक खेड्याच्या परिसरात हा ‘सारस‘ सध्या जगण्याचा संघर्ष करत आहे. स्वार्थी मानवी स्वभावाचा
बळी ठरत असलेला व जगभरात नामशेष होत असलेला ‘सारस‘ जगावा, यासाठी गोंदीया जिल्हाधिकारी कार्यालय आणि सेवाभावी संस्थांनी पराकाष्ठा सुरू केली आहे.
पायाची नखे ते चोच अशी किमान साडेपाच ते सहा फूट उंचीचा हा अत्यंत देखणा पक्षी. विस्तीर्ण पंख विखुरले तर तब्बल चौदा ते सोळा फुटांपर्यंत रुंद..! भातशेतातच स्वत:चं घर करणारा अन्‌ त्यामध्ये किमान तीन ते चार किलो वजनाचं अंड घालून प्रजातींची संख्या वाढवणाऱ्या या पारस पक्ष्यांवर शेतकऱ्यांची कुऱ्हाड कोसळत होती. 2000 पर्यंत नामशेष होण्याच्या मार्गावर सारस होता. केवळ चार जोड्याच शिल्लक होत्या.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

गणपती बाप्पा मोरया...

मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा...

आमची बोली भाषा - अहिराणी

बॅड पॅच

अभिनंदन केले पाहिजे

एक छोटासा प्रयत्न

मनातलं मन...

तूच तुझी वैरी

सहज सुचली म्हणून....