यश मिळालं.... मिळेल

         काल जे शनिशिंगनापुरच्या अभूतपूर्व लढ्याला यश मिळालं...आणि ज्या लढ्यासाठी तृप्ती देसाई यांनी आंदोलन केलं...आणि जेष्ठ सामाजिक कार्यकर्त्या विद्या बाळ यांच्या न्यायालयीन लढाईतून हा संवैधानिक विजय प्राप्त झाला आहे.
ही लढाई होती समान अधिकाराची...लढाई होती स्त्री-पुरुष विषमता नष्ट करण्याची...लढाई होती धर्माच्याच नावावर चालणाऱ्या अधार्मिक चुकीच्या प्रथा नष्ट करण्याची...
   आता गम्मत अशी आहे की..
  जे तथाकथित संस्कृतीरक्षक या लढाईला कडाडून...चवताळून...अरेरावीची भाषा वापरून...मिडियात असो...वा सोशल मिडियात असो...आक्रमकपणे विरोध करत होते...आज मात्र तेच 'पहा आमचा हिंदू धर्म कसा लवचिक आहे...सुधारनावादी आहे...सहिष्णु आहे...' या आणि अशा बाता मारताना दिसत आहेत...
  ज्या-ज्या वेळी मन्दिर प्रवेशाचा मुद्दा निघायचा...त्या त्या वेळी या हिंदू संस्कृति रक्षकांना मात्र काळजी मुस्लिम स्त्रियांच्या मश्जिद प्रवेशाची असायची...'त्यांच्यासाठी आधी लढा...'असा उदार(?) हेतु त्यांचा असायचा... स्वतःला हिंदू धर्माचे ठेकेदार समजाणाऱ्या लोकांना आपल्या धर्मातील स्त्रियांच्या समानतेची पर्वा तर नाहीच पण इतर धर्मातील स्त्रियांची एव्हडी काळजी कशी काय बरे...?यांना धर्मद्रोही का म्हणू नये..?
   समजा मुस्लिम भाई-बांधवांनी शनी-शिंगनापुरला हिंदू महिलांना प्रवेश मिळावा म्हणून तृप्ती देसाई यांच्यासारखं मोठं आंदोलन उभं केलं असतं तर या संस्कॄतिरक्षक म्हणवून घेणाऱ्या लोकांची प्रतिक्रया काय बरे असती...? विचार करा..?
कल्पना न केलेलीच बरी...
   म्हणजे स्वतःच्या घरातील कचरा राहिला बाजूला आणि दुसर्याच्या घरातील कचरा का साफ करत नाही..? असा बुद्दिभेदि सवाल मुद्दाम उपस्थित केला जात असे...जेनेकरुन ही विषमता अशीच चालू रहावी...आणि  अमानुष पुरुषप्रधान संस्कृतीचे उदात्तीकरण व्हावे...हां त्यामगाचा खटाटोप....
जी लोकं या लढ्याला विरोध करत होती तीच लोकं कालांतराने जेंव्हा हां मुद्दा पुन्हा केंव्हाही निघेल तेंव्हा पुन्हा दुट्टपीपणे अस बोलताना दिसतील की ' पहा...हां क्रांतिकारी निर्णय आमच्या सरकारच्या काळात झालाय...अमुक-तमुक पक्षाला जे जमले नाही ते आमच्या सरकारने केले...वगेरे वगेरे बाता मारून पुन्हा या लढ्याचे राजकिय श्रेयही लाटताना दिसतील...
पण मुळात हा लढा सामाजिक न्यायाचा आहे...
  डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी या आणि अशाच सामाजिक न्यायासाठी मंदिरप्रवेशाची केलेली चळवळ असो वा सार्वजनिक पानवठे अस्पृश्य लोकांना खुले करण्यासाठी दिलेला लढा असो...त्यावेळीही याच पद्धतीने स्वतःला संस्कॄति रक्षक समजणाऱ्या लोकांनी या लढ्याला कडाडून विरोध केलेलाच होता...
पण शेवटी विजय सामाजिक न्यायाचा झाला...विजय सामाजिक समतेचा झाला...

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा...

आमची बोली भाषा - अहिराणी

शुभ दिपावली

अभिनंदन केले पाहिजे

त्या आठवणी...

गणपती बाप्पा मोरया...

एक छोटासा प्रयत्न

तूच तुझी वैरी