प्रेम केलंय ना...

एक सुंदर स्टोरी
तो पुण्यात होता.....
काही कामानिमित्त
गेला होता.. त्या दिवशी तिने
news मध्ये ऐकला कि स्वारगेट
जवळ एका bus driver ने
... गाडीखाली लोकांना चिरडले.. तिने
लगेच त्याला call केला,
ती :"हेल्लो, कुठे आहेस तू??"
तो :"आणखी कुठे असणार आहे??
मी काही इथे पिकनिक
साठी नाही आलोय."
ती :"अरे मला अस म्हणायचं होता कि..."
तो :"हे बघ, मला काम आहेत,
आपण मी परत आल्यावर बोलू,
कळल ना??"
ती :"अरे स्वारगेट
ला accident झालाय बस मुळे.. म्हणून
मी..."
तो : (चिडून)"त्यात काय ऐवढ,
रोजच होतात,
तुम्हा बायकांना ना विनाकारण
काळजी करण्याची सवय असते..
आता म्हणशील कि रस्ता नीट बघून क्रॉस
करत जा, गाडी हळू
चालव, अस तसं.... ठेव फोन आता,
मला वेळ नाही आहे.. आणि प्लीज
मला call करू नको,
मी तुला बोलतो रात्री, बाय"
अस म्हणून त्याने फोन ठेवून दिला..
संध्याकाळी,
घरी येताना तो फोन वर बोलत
बोलत रोड क्रॉस करत होता,
तेवढ्यात समोरून एक
गाडी त्याच्या अगदी जवळ
येऊन थांबली.. त्याला काहीही लागलं
नाही...
पण त्याची छाती धडधडू
लागली.. त्याने कोपऱ्यावर
जाऊन आधी तिला फोन केला,
म्हणाला,
"तू म्हणालीस ते बरोबर आहे, मी कधीच
नीट बघून
रस्ता क्रॉस करत नाही..
आज
माझं काही खरच नव्हतं... तू आहेस
म्हणून माझी गाडी रुळावर आहे,
मी तुझ्या अंगावर ऐवढ
ओरडलो... तरी तू शांतपणे ऐकून
का घेतलास??"
ती म्हणाली,"काय करणार,
प्रेम केलंय ना...

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

गणपती बाप्पा मोरया...

मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा...

आमची बोली भाषा - अहिराणी

बॅड पॅच

अभिनंदन केले पाहिजे

एक छोटासा प्रयत्न

मनातलं मन...

तूच तुझी वैरी

सहज सुचली म्हणून....