कोणालाही कमी समजू नये ....

विंडीजचा विजय ऐतिहासिक तर आहेच, पण एखाद्याला डिवचले तर तो जिद्दीने सर्वोच्च यश मिळवते याची प्रचीतीही यातून मिळले. एरवी आपण असे फक्त पुस्तकांमध्ये वाचतो, किंवा चित्रपटात पाहतो; पण वेस्ट इंडिजने हे प्रत्यक्षात करून दाखविले आहे. एकेकाळी कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेटमध्ये या संघाचा दबदबा होता. एकदिवसीय क्रिकेटमध्ये पहिले दोनही विश्वकरंडक त्यांनीच जिंकले होते. वेस्ट इंडिजच्या खेळाडूवर आपण खूप जोक केले. त्यांच्या रंगावरून मस्करीही केली. पण मन मोठ्ठ असावं तर वेस्टइंडीज सारखं.
ज्या संघाला जर्सी घ्यायला त्यांच्याच बोर्डाने फंड दिला नाही, ज्या संघाने स्वताच्या खर्चातून भारतापर्यंत प्रवास केला, ज्या संघाच्या जर्सी आणि
भारतातील प्रवासाचा आणि राहण्याचा खर्च BCCI (भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्ड) ने केला त्याच संघाने काल टी20 विश्वचषक जिंकला आणि त्यातून मिळालेली काही रक्कम त्यांनी कोलकत्ता मधील सामजिक संस्था मदर टेरेसा ट्रस्टला
दिली.
वेस्टइंडीजने उपकाराची नुसती परतफेड केली नाही तर मन ही जिंकली.....
सलाम यारो!!!!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

"महाराष्ट्राची कुलस्वामिनी" तुळजाभवानी मंदिर पाचपाखाडी गणेशगल्ली ठाणे

        ठाणे शहर हे निसर्गसंपन्न, ऐतिहासिक आणि सांस्कृतिक दृष्टिकोनातून समृद्ध शहर आहे.ठाणे हे फक्त निवासी ठिकाण नसून ते निसर्ग,...