चचे॑त कसे राहावे

    शंकराचार्य स्वामी स्वरुपानंद सरस्वती यांनी पुन्हा एकदा साईबाबा आणि साई भक्तांना लक्ष्य केले असून. पूजेस 'अपात्र' असलेल्या साईबाबांची पूजा केल्यानेच महाराष्ट्रात दुष्काळ परिस्थिती उद्भवली आहे, असे वादग्रस्त वक्तव्य करुन आपले हसू करुन घेतले आहे.  शंकराचार्य स्वामी स्वरुपानंद पुन्हा चर्चेत आले आहेत. यांना कोण समजून सांगणार की पूजा आरत्या मिरवणुका काढून काही होत नाही. जे वाईट कृत्य कराल ते याच जन्मात फ़ेडावे लागते. यात देव सुद्धा काही करू शकत नाही. आमच्या स्वार्थी वृत्तीने निसर्ग लुटून खाल्ला आता निसर्ग आम्हाला आमची जागा दाखवेल. हा दुष्काळ कुंभमेळ्या मुळे पडला.कुंभमेळ्यात करोडो रुपये खर्च झाले.ते जर दुष्काळ रुपये त्या शेतकऱ्यांना वाटले असते तर शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या नसत्या.आणि लाखो लीटर पाणी हे त्या कुंभमेळ्यात वाया गेल ते पाणी मराठवाड्यातील जनता पिली असती....
  आत्ता खरी गरज आहे ती सर्व बाबा महात्मा साधु संत यांनी त्यांचे अस्तित्व सिद्ध करण्याची कारण आश्रमात /मठात बसुन गप्पा करून काही साध्य होणार नाही सर्व बाबांनी व त्यांच्या लाडक्या भक्तानी दुष्काळाची व्याप्ती कमी करण्यासाठी बाहेर येऊन प्रत्यक्ष काम करण्याची गरज आहे पोथ्या पुराण वाचुन दुष्काळ  कमी होणार नाही तर प्रत्यक्ष कृती करण्याची गरज आहे  माझी सर्व स्वयंघोषीत  बाबाजीना कळकळीचे आवाहन आहे की दुष्काळी भागासाठी एवढे केले तरी पुष्कळ आहे  असे केले तर लोक नेहमी तुमच्या सोबत असतील.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा...

आमची बोली भाषा - अहिराणी

शुभ दिपावली

अभिनंदन केले पाहिजे

त्या आठवणी...

गणपती बाप्पा मोरया...

एक छोटासा प्रयत्न

तूच तुझी वैरी