हे कधी थांबणार

  प्रत्येकाने आपापल्या परीने समाजात लोकशाहीचा आधारस्तभ म्हणून यशस्वी प्रयत्न केला.त्यात आमचाही खारीचा वाटा या ध्येयाने प्रेरित होऊन आमचा हा अल्पसा प्रयत्न आणि म्हणून आम्ही एक वाचन साहित्य सुरु करीत आहोत.एक हक्काचे व्यासपीठ जे तुमच्या मनात ते आमच्या पानात प्रत्येक वेळी एक वेगळा विषय घेऊन.
    आयपीएलचे सामने महाराष्ट्रात खेळविणे ही दुष्काळग्रस्तांची क्रूर थट्टा आहे .देशांत वर्षभर कुठे नाकुठे कसोटी सामने ,एकदिवसीय सामने आणि T-20 सामन्यांचा उरुस भरलेलाच असतो.मग कुठलेही महत्व नसणाऱ्या या आयपीएलचा तमाशा ऐन  उन्हाळ्यात आणि तोही आपल्यासारख्या दुष्काळग्रस्त देशात अट्टाहासाने भरवण्यात कुठलं शहाणपण आहे ? पैशाला हपालेले हे आयपीएलचे आयोजक इतके संवेदनाहीन कसे? करमणुकीसाठी चालविलेली ही थेरं तात्काळ बंद व्हायलाच हवीत. त्यासाठी आता सरकारनेच कुठल्याही,कोणाच्याही दबावाला बळी न पडता यात हस्तक्षेप करुन हे श्रीमंती चाळे थांबवायला हवेत. आणि हे जर होणार नसेल तर मग आताच्या सरकारमध्ये आणि पूर्वीच्या सरकारमध्ये फरक तो काय राहिला असा सवाल जर दुष्काळग्रस्त जनतेच्या मनात उभा राहिला तर काय चूक?मग खेळपट्टी उखडण्याचे प्रकार तर संताप आणि उद्वेगातून घडणारच; आणि ते समर्थनीय आहेत असंच म्हणावं लागेल.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा...

आमची बोली भाषा - अहिराणी

शुभ दिपावली

अभिनंदन केले पाहिजे

त्या आठवणी...

गणपती बाप्पा मोरया...

एक छोटासा प्रयत्न

तूच तुझी वैरी