यश की अपयश
बेरोजगारांना रोजगार सहाय्य देण्यासह विद्यार्थी व तरुणांना मार्गदर्शन करण्याच्या उदेशाने राज्य सरकारने एम्लाॅयमेंट एक्स्चेजची स्थापना केली. शेकडो तरुण आणि तरुणी नोकरी
मिळविण्यासाठी या केंद्रात नाव नोंदवतात. सन 2010 मध्ये ठाण्यात याच केंद्रातून 41 हजार 82 बेरोजगारांना नोकरी मिळाली होती. सन 2011 मध्ये तो आकडा 11 हजार 975 इतका घसरला आणि 2012 मध्ये हे प्रमाण केवळ साडेआठ टक्के आहे. ठाणे एम्लाॅयमेंट एक्स्चेजच्या नोंदणीपटावर 1 लाख 4 हजार 793 मधुन फक्त 13 हजार 277 उमेदवारांनाच नोकरी मिळाली. त्यातील 13 हजार 119 नोकऱ्या खाजगी क्षेत्रातील आहेत केंद्र सरकारच्या सेवेत 28 राज्य शासनात 83 जणांना नोकरी मिळाली आहे. तसेच 513 अपंग 795 मूक बधिर मधुन एक अंध उमेदवाराला नोकरी मिळाली.
सन 2014 मध्ये या विभागाच्या नोंदणीपटावर 2 लाख 32 हजार बेरोजगार नोकरी च्या प्रतीक्षेत होते त्यापैकी फक्त 21 हजार जणांना नोकरी मिळाली तर 2015 मध्ये हा आकडा आणखी घसरला असून 2 लाख 22 हजार मधून फक्त 7 हजार 382 जणांना नोकरी मिळाली.
टिप्पण्या