एक नविन पत्रकारिता

    'कन्हैय्याला मनसेचे कवच' अशी निराधार बातमी देणाऱ्या जय महाराष्ट्र वाहिनीचा खोटेपणा उघड झाला. वृत्तवाहिनीने आज बेधडक
पणे आणि वस्तुस्थितीचा कोणताही आधार नसताना'महाराष्ट्रात कन्हैय्याला राज ठाकरे समर्थन देणार, अशी बातमी चालवली आणि एकूणच राजकीय वर्तुळात आणि समाज माध्यमांवर खळबळ उडवण्याचा प्रयत्न केला.जय
महाराष्ट्र' हा शब्द उच्चारला किंवा ऐकला तरी मराठी माणूस काही क्षण का होईना रोमांचित होतो. अशी ताकद या शब्दात आहे.पण 'जय महाराष्ट्र' याच नावाने चालणाऱ्या वाहिनीने या शब्दाला आज बट्टा लावला.राजसाहेबांवर टीका केली की टीआरपी मिळतो हे गणित माहित असल्यामुळे टीआरपी कमी झाला की कर राजसाहेबांवर टीका हा माध्यमांचा खाक्या आहे. पण आज जय महाराष्ट्रने तर यांवर कडी केली.साहेबांनी न केलेलं विधान आणि न मांडलेली भूमिका चॅनेलवर मांडून टाकली.कोण कुठला कन्हैय्या त्याला मनसेचं कवच म्हणे.अहो जिथे आमचा नेता एका बाजूला मराठवाड्यातल्या उन्हात मराठी तरुणांच्या हक्कांसाठी झालेल्या आंदोलनाच्या वेळच्या केसेसकरता न्यायालयात हजर राहतोय आणि दुसरीकडे दुष्काळग्रस्तांकरता जलसंधारणाचे प्रकल्प राबवतोय तो असल्या कन्हैय्या सारख्या रिकामटेकड्या माणसाला कवच द्यायला कशाला जाईल.
      जंगलात वाघ नुसता फेरफटका मारायला जरी बाहेर पडला तरी बाकी प्राण्यांची धावपळ सुरु होते. हे प्राणी चित्रविचित्र आवाज करतात, ओरडतात,एक दुसऱ्याला खाणाखुणा करतात! काही प्राण्यांची अवस्था तर अत्यंत वाईट असते, चरता चरता देखील त्यांना वाघ आल्याचा भास होतो,आणि ते इतर प्राण्यांना चुकीचे सिग्नल देतात. कारण असते,वाघाची भिती!!! राजसाहेबांचे महाराष्ट्र दौरे सुरु झाले की त्यांच्या विरोधकांची अवस्था अशीच काहीशी होते.
    राजसाहेब सध्या मराठवाडा दौऱ्यात आहेत आणि तिथे पत्रकारांनी या विषयी प्रश्न विचारले असता, राजसाहेबांनी रोखठोक शब्दांत प्रतिक्रिया दिली आणि या पद्धतीच्या पत्रकारितेचा समाचार घेतला."अश्या पद्धतीचे विधान आमच्यापैकी कोणत्याही नेत्याने अथवा प्रवक्त्याने केलेले आहे का? मग  कन्हैय्याला मनसेचा पाठींबा आहे का, हा प्रश्न येतो कोठून?प्रश्न हेच निर्माण करणार,आणि उत्तरं आमच्याकडे विचारणार."या पत्रकार परिषदेला 'जय महाराष्ट्र'या वाहिनीचा प्रतिनिधी होता हे विशेष त्याला राजसाहेबांनी विचारलं की "तुमच्याशी या विषयावर पक्षातून बोललं कोण?"यावर त्या प्रतिनिधी
कडे उत्तर नव्हतं.त्यावर पुढे राज
साहेब म्हणाले "तुम्ही बातम्या बेधडक टाकून द्यायच्या आणि त्याची उत्तरं आम्ही द्यायची?. तुमच्या ऑफिसने आमच्यावतीने स्टेटमेंट काढायची आणि आम्हाला उत्तरं विचारायची?. ही कुठली तुमची नवीन पत्रकारिता आता'. असा टोला देखील हाणला.
'कन्हैय्याला मिळणार मनसेचे कवच' या जय महाराष्ट्रच्या मथळ्यावर,उपरोधिक टीका करताना राजसाहेब म्हणाले, "कार्यक्रम त्यांचा आणि मी कशाला कवच देऊ, कवचाची फॅक्टरी आहे का माझी?".

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा...

आमची बोली भाषा - अहिराणी

शुभ दिपावली

अभिनंदन केले पाहिजे

त्या आठवणी...

गणपती बाप्पा मोरया...

एक छोटासा प्रयत्न

तूच तुझी वैरी