सहजच सूचले म्हणून

कांद्याचे टोमॅटोचे भाव पडल्यावर शेतकरी रस्त्यावर कांदे टोमॅटो फेकून निषेध करतो .......
दुधाचे भाव पडल्यावर दूधगवळी रस्त्यावर दूध ओतून सरकारचा निषेध करतो......
एवढंच काय कोणताही भाजीपाला, वस्तु यांचा व्यापार करणारे हेच करतात....
मग जवळ जवळ महिनाभर संप पुकारणारे सराफ यांनीही सोन रस्त्यावर टाकून निषेध करायला काय हरकत आहे.
!एका देवळात असलेली प्रचंड गर्दी एक मुलगा
कुतूहलाने पाहत होता;
तेवढ्यात एक पंडित त्याच्याजवळ येऊन त्याला
म्हणाला,
"आज देवळात खूप गर्दी आहे, असे उभे राहून दर्शन
होणे कठीण, इथे विशिष्ट व्यक्तींसाठी विशेष
व्यवस्था आहे, मला ५०१/-  रुपये दे, मी तुला थेट दर्शन
करवून देतो!
मुलगा म्हणाला,
"५००१/- रुपये देतो, देवाला सांग, बाहेर ये, मी
आलोय!"
पंडितजी,
"मस्करी करतोस, देव कधी देवळाबाहेर आलाय का?
आणि तू कोण आहेस?"
मुलगा पुन्हा म्हणाला,
"मी ५१०००/- रुपये देतो, देवाला सांग, माझ्या
घराजवळ येऊन भेट!"
पंडितजी,"तू देवाला समजतोस तरी काय?"मुलगा,"तेच तर मी म्हणतोय...
"तुम्ही सर्व जण देवाला
समजता तरी काय..?
पैसे कमावण्याचे साधन?"

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

"महाराष्ट्राची कुलस्वामिनी" तुळजाभवानी मंदिर पाचपाखाडी गणेशगल्ली ठाणे

        ठाणे शहर हे निसर्गसंपन्न, ऐतिहासिक आणि सांस्कृतिक दृष्टिकोनातून समृद्ध शहर आहे.ठाणे हे फक्त निवासी ठिकाण नसून ते निसर्ग,...