काय चुकलं

क्रिकेट समालोचनाबद्दल बोलायचं झाल्यास सवा॑त प्रसिद्ध आणि लोकप्रिय समालोचक कोण असा प्रश्न जर कोणाला विचारला तर सर्व लोकांच्या समोर येतो तो म्हणजे हष॑ भोगले आणि खरंच हर्ष भोगले यांच्यातही हा ‘प्रोफेशनॅलिझम’ आपणास पाहायला मिळतो. क्रिकेटवरचं प्रेम,भाषेवरचं प्रभुत्व, कामावरची श्रद्धा, जबाबदारीचं भान आणि क्रीडाक्षेत्राची जाण,या गुणांवर त्यांनी जगभरातील क्रिकेटचाहत्यांच्या मनात प्रेमाचं – आदराचं स्थान निर्माण केलंय.
     एखादा भाविक प्रवचनात जसा तल्लीन होतो रमतो,तितक्याच तन्मयतेनं त्यांची ‘कॉमेन्ट्री’ ऐकणारे एक नाही तर अनेक क्रिकेटप्रेमी आपणास पहायला मिळतील.असं असतानाही देखील,कुठलंही कारण न देता बीसीसीआयनं त्यांना आयपीएल स्पर्धेपासून दूर ठेवल्यानं सगळ्यांनाच धक्का बसलाय.कटप्पाने बाहुबलीला का मारलं? या प्रश्नांप्रमाणेच हर्ष भोगलेंचं काय चुकलं? हा प्रश्न आज अखिल क्रिकेटविश्वाला पडलाय. सत्य आणि स्पष्ट बोलणारा कडू वाटत असला तरी,तो धोकेबाज कधीच नसतो त्यामुळेच तर चांगल्या रस्त्याला गतिरोधक आणि चांगल्या व्यक्तिला विरोधक हे असतातंच…! कटप्पाने बाहुबली का मारले याचे उत्तर सिनेमाच्या दुसऱ्या भागात कळेल पण भोगले यांचे काय चुकले या प्रश्नाचे उत्तर मात्र आम्हाला कोण सांगणार?

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा...

आमची बोली भाषा - अहिराणी

शुभ दिपावली

अभिनंदन केले पाहिजे

त्या आठवणी...

गणपती बाप्पा मोरया...

एक छोटासा प्रयत्न

तूच तुझी वैरी