सैराट बघा
‘सैराट’ हा चित्रपट प्रदर्शनापूर्वीच चर्चेत राहिला आहे. त्यातूनचं दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी चित्रपटाचा टीजर आणि प्रोमो गाणे प्रदर्शित करून सर्वांचीच उत्सुकता शिगेला पोहचवली आहे.
सैराट बघण्याची 17 कारणे
---------------------------------
1) जगभर गाजलेला फँड्री बनवणाऱ्या दिग्दर्शकचा दूसरा चित्रपट
---------------------------------
1) जगभर गाजलेला फँड्री बनवणाऱ्या दिग्दर्शकचा दूसरा चित्रपट
2) अजय-अतुल या प्रतिभावंतांचे संगीत
3) बर्लिन अंतरराष्ट्रिय चित्रपट महोत्सवात 2016 मधील एकमेव मराठी चित्रपट
4) बर्लिन अंतरराष्ट्रिय चित्रपट महोत्सवात आजवर निवड झालेला केवळ चौथा मराठी चित्रपट
5) हॉलीवुड मधे संगीत रिकॉर्डिंग झालेला सैराट हा केवळ मराठीच नव्हे तर भारतातील पहिला चित्रपट
6) रिंकू राजगुरु ह्या नाववीत शिकणाऱ्या अकलूजच्या ( सोलपुर ) पोरीने पहिल्याच चित्रपटासाठी राष्ट्रिय पुरस्कार पटकावला
7) 'पिस्तुल्या' , 'फँड्री' आणि आता 'सैराट' या तिन्ही चित्रपटासाठी अनुक्रमे सूरज पवार, सोमनाथ अवघडे आणि रिंकू राजगुरु यांना सलगपणे राष्ट्रिय पुरस्कार मिळवून देऊन हैट्रिक साधणारा कदाचित एकमेव भारतीय चित्रपट दिग्दर्शक- नागराज पोपटराव मंजुळे
8) नवख्या नॉन-एक्टर पोरांना घेऊन अफलातून अविश्वसनीय काम करून घेणारा दिग्दर्शक
9) आतापर्यन्त रिलीज झालेले अत्यंत दर्जेदार टीजर व song प्रोमो, ट्रेलर
10) आकाश ठोसर हा मराठी चित्रपट सृष्टिला घवसलेला योग्य वयातील हैण्डसम हिरो
11) खऱ्या अर्थाने सिनेमैटिक लैंग्वेजचा वापर करणारा दिग्दर्शक उदा: फँड्री, सैराटचे टीजर song promo
12) जातिभेदाचे विषमतेचे चटके सोसत तळा गाळातून जीवघेणा संघर्ष करीत वर आलेल्या व तरीही कोणाबद्दल द्वेष वा मनात विखार न बाळगणाऱ्या माणसाची अभिव्यक्ति- सैराट
13) प्रखर सामजिक भान असणारा माणसाची कलाकृती
14) जातीपातीला विषमतेला मुठमाती देण्यासाठी झटनारा दिग्दर्शक
15) आपल्या अपेक्षा खोट्या ठरवत आपल्या गुळगुळीत झालेल्या अभिरुचिला धक्का देणारा व नव्यानं चित्रपटाची भाषा समजून सांगणारा दिग्दर्शक
16) नागराज पोपटराव मंजुळे - बस नाम ही काफी है फ़िल्म देखने के लिए
17) कुठल्याही जातिपातीच्या चौकटीत न अडकता माणूस म्हणून उन्नत भूमिका मांडणाऱ्या माणसाची कलाकृती.
नक्की पहावा
प्रदर्शित तारीख:- २९/४/२०१६
प्रदर्शित तारीख:- २९/४/२०१६
Hindi चित्रपटांची जाहीरात खूप करता, आता एकदा मराठी चित्रपटाचीही करा.. जय महाराष्ट्र..
टिप्पण्या