आता पोलिओ इंजेक्शन

देश पोलिओमुक्त झाल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने २७ मार्च २०१४ ला जाहीर केले. त्यानंतर पी १ आणि पी ३ विषाणूबाधित रुग्णांसाठी केंद्र शासन आणि राज्य शासनाने पोलिओ लसीकरणात बदल केले आहेत. आता पी १ आणि पी ३ च्या विषाणूंसाठी बालकांना पोलिओ इंजेक्शन (आय.पी.व्ही) देण्यास सुरुवात करण्यात आली आहे.
२५ एप्रिलपासून देशभरात ही लसीकरण पद्धत सुरु करण्यात आली आहे. बालकांना मुखावाटे देणाऱ्या पोलिओ लसीच्या पहिल्या व तिसऱ्या डोसाबरोबर पोलिओ इंजेक्शन ही लस देण्यात येणार आहे. ही लस ०.१ मी.ली उजव्या दंडावर इंजेक्शनद्वारे दिली जाणार आहे  त्यामुळे बालकांना पोलिओ रोगापासून दुहेरी संरक्षण मिळणार आहे. या दोन्ही लसी एकत्रितपणे पोलिओ रोगाचा पुर्न:उद्भव आणि पुर्न: संसर्ग रोखता येतील.
पोलिओ हा आजार पी १, पी २ आणि पी ३ या तीन विषाणूंमुळे होतो. तीन वर्षांत देशात एकही पोलिओचा नवीन रुग्ण आढळून न आल्यामुळे जागतिक आरोग्य संघटनेने देशाला ‘पोलिओमुक्त घोषित’ केले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा...

आमची बोली भाषा - अहिराणी

शुभ दिपावली

अभिनंदन केले पाहिजे

गणपती बाप्पा मोरया...

तूच तुझी वैरी

एक छोटासा प्रयत्न

त्या आठवणी...