चला चिमण्या वाचवूया

‘सकाळ’च्या ‘चला, चिमण्या वाचवूया’ उपक्रमातून झालेल्या जनजागृतीनंतर चिऊताई अंगणात येण्यासाठी विविध प्रयोग यशस्वी झाले. चिऊताई अंगणात आली; पण तापमानच ४० अंशांच्या पुढे गेल्यानंतर जेव्हा माणसालाच पाण्यासाठी दाहीदिशा फिरण्याची वेळ आली, तेव्हा आता चिऊताईला पाणी देण्यासाठीही विविध संकल्पना नव्याने पुढे येऊ लागल्या आहेत.  चिऊताईला घरट्याबरोबरच तिच्या तृषाशांतीसाठी, तिला स्वच्छंदपणे बागडण्यासाठी तुम्हीही आणखी काही नवीन संकल्पना राबवत असाल तर त्याची छायाचित्रे आपले नाव व पत्त्यासह शेअर करा, या व्हॉट्‌सॲप क्रमांकावर -७७२१९८४४४१

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

गुढी पाडवा शोभायात्रा २०२५

शांती सागर वॉटर रिसोर्ट अंबरनाथ एन्ट्री फी फक्त ३५०/ - रुपये