सुट्टयांमध्ये काय कराल
सुट्टयांमध्ये टाइमपास म्हणजे फेसबुकवर वेळ घालवणे. याच जोडीला आपण अशा काही गोष्टी करु शकतो,ज्यामुळे आपल्याला भविष्यात आपल्या करिअरला त्याचा फायदा होऊ शकतो.यासाठी तुम्हाला कुठल्याही वक॑शाॅपला जाण्याची गरज नाही.
ब्लॉगर.कॉम -आपल्या मनातील भावना,वाचनात येणा-या चांगल्या गोष्टी आपल्या आवडीच्या गोष्टी लिहून ठेवाव्याशा वाटतात.तर तुम्ही या वेबसाईटवर ब्लॉग तयार करू शकता. त्या ब्लॉगची डिझाइन आणि त्यातले आटि॑कलही सेट करू शकता.ही फ्री वेबसाईट आहे आणि जर तुम्हाला जास्तीत जास्त लोकांना पोहोचवयाचा असेल, तर गुगलने अॅडसेन्स असा प्रोग्राम काढला आहे ज्यात तुम्ही प्रत्येक महिन्याला काही ठराविक रक्कम गुगला देऊन तुमच्या ब्लॉगला जास्तीत जास्त पोहचवू शकता.
फेसबुकवर पेज - फेसबुकवर तासन्तास वेळ घालवित असतांना आपण आपल्या आवडीच्या विषयावर ऐखादं फेसबुकवर पेज तयार करून त्यावर जास्तीत जास्त लाइक्स आणि कमेंटस मिळवू शकता एखाद्या विषयावर अधिक संवाद घडवून आणला जाऊ शकतो.
टि्वटर - आपले विचार थोडक्या शब्दात लोकांना पोहोचवयाचे असल्यास याचा वापर करू शकतो फाॅलोअस॑ मिळवू शकतो तसेच त्यांच्याशी संवाद साधू शकता फेसबुक पेज लिंक करू शकता
युटयूब - तुमच्यातील कला लोकांपर्यंत पोहोचविण्याचे प्रभावी माध्यम म्हणून सध्या याकडे पाहिले जाते 'कोलावेरी डे' या गाण्याचे यशही या वेबसाईटमध्येच दडले आहे. तुम्ही तुमची कला सादर करुन आपल्या आवडीच्या क्षेत्रात चांगली संधीही मिळू शकते.
वीबली.कॉम - विविध एलिमेंट्स व्हिडीओज फोटो गॅलरीज मॅप्स आणि इतर फीचस॑ यात तुम्हाला मिळेल पस॑नल आणि बिझनेस वेबसाइट्स तयार करू शकता तसेच त्या वेबसाईटला प्रोफेशनल लूक देता येतो ज्यांना वेबसाइट डिझाइन करण्याची आवड आहे अशा लोकांनी याची मदत घेऊन काम करण्यास काहीच हरकत नाही
टुम्बलर.कॉम - तुम्हाला भांरभार लिहायला आवडत नसेल आणि टि्वटरपेक्षा जास्त स्पेस हवी असेल तर तुम्ही micro ब्लॉगिंगचा पयार्य स्वीकारू शकतात या साठी त्याचा वापर करू शकतो यात डॅशबोड॑ टॅगिंग असे अनेक फीचस॑ आहेत आपला ब्लॉग चांगल्या प्रकारे लोकांनासमोर सादर करता येतो.
फेसबुकवर तासन्तास वेळ घालवित असताना आपण आपली कौशल्ये विकसित करू शकतो आणि तुमचे टॅलेण्ट इतर लोकांनासमोर आणण्यासाठी अशा सोशल वेबसाईट्सचा वापर करता येतो आणि सुट्टी सार्थकी लावता येऊ शकते मग मित्रांनो सुट्टीत मज्जा मस्ती याच बरोबर थोडावेळ या
साठी खर्च केला तर तुमच्या करिअरला नक्कीच फायदा होऊ शकतो.
फेसबुकवर तासन्तास वेळ घालवित असताना आपण आपली कौशल्ये विकसित करू शकतो आणि तुमचे टॅलेण्ट इतर लोकांनासमोर आणण्यासाठी अशा सोशल वेबसाईट्सचा वापर करता येतो आणि सुट्टी सार्थकी लावता येऊ शकते मग मित्रांनो सुट्टीत मज्जा मस्ती याच बरोबर थोडावेळ या
साठी खर्च केला तर तुमच्या करिअरला नक्कीच फायदा होऊ शकतो.
टिप्पण्या