मैत्रीण पाहिजे

मैत्रीण पाहिजे अशी
कधी कधी तिढ्यात
कधी कधी कोड्यात
कधी गोडीत बोलणारी...
मैत्रीण पाहिजे अशी
कधी सुख वाटणारी
कधी दु:ख वाटणारी
कधी समजून घेणारी...
मैत्रीण पाहिजे अशी
कधी आपलंस करणारी
कधी अश्रु पुसणारी
कधी कधी झापणारी..
मैत्रीण पाहिजे अशी
नेहमी मन जाणनारी
ह्रदयात बसणारी
गालात हसणारी..
मैत्रीण पाहिजे अशी
वाट दाखवणारी
कौतुकाने पाहणारी
संकटात हात देणारी...
मैत्रीण पाहिजे अशी
ओठावर हसु आणनारी
कधी डोळे वटारणारी
चुकलं तर कान धरणारी...
मैत्रीण पाहिजे अशी
जीवाला जीव देणारी
कधी भाव खाणारी
कधी भाव देणारी...
मैत्रीण पाहिजे अशी
कधी तिखट बोलणारी
कधी तिखट वागणारी
कधी गोडी लावणारी...
मैत्रीण पाहिजे अशी
मंजुळ पाव्यासारखी
दुधाच्या खव्यासारखी...

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

"महाराष्ट्राची कुलस्वामिनी" तुळजाभवानी मंदिर पाचपाखाडी गणेशगल्ली ठाणे

        ठाणे शहर हे निसर्गसंपन्न, ऐतिहासिक आणि सांस्कृतिक दृष्टिकोनातून समृद्ध शहर आहे.ठाणे हे फक्त निवासी ठिकाण नसून ते निसर्ग,...