आपण कोण आहोत

मित्रांनो...
ते म्हणाले सतीची प्रथा चालू रहावी
हे म्हणाले सतीची प्रथा बंद व्हावी
हरले ते आणि जिंकले हे!
ते म्हणाले स्त्रीयांना शिक्षण नको
हे म्हणाले स्त्रींयाना शिक्षण मिळायला हवे
हरले ते आणि जिंकले हे!
ते म्हणाले विधवांचे केशवपनच व्हावे
हे म्हणाले केशवपन बंद झाले पाहीजे
हरले ते आणि जिंकले हे!
ते म्हणाले विधवांचा पुनर्विवाह नकोच
हे म्हणाले विधवांचा पुनर्विवाह झाला पाहीजे
हरले ते आणि जिंकले हे!
ते म्हणाले अस्पृष्यांना समान अधिकार नको
हे म्हणाले अस्पृष्यांना समान अधिकार हवा
हरले ते आणि जिंकले हे!
ते म्हणाले स्त्रियांना संपत्तीत हिस्सा नको
हे म्हणाले स्त्रीयांना संपत्तीत हिस्सा हवाच
हरले ते आणि जिंकले हे!
ते म्हणाले इथे यांना वा त्यांना प्रवेश नको
हे म्हणाले इथे सर्वांनाच प्रवेश मिळालयला हवा
हरले ते आणि जिंकले हे!
जगाचा इतिहास सांगतो
सातत्याने ते हरले
सातत्याने हे जिंकले
ते सतत हरतात आणि हे सतत जिंकतात ...
आपण कोण आहोत?
ते आहोत की हे आहोत...?

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा...

आमची बोली भाषा - अहिराणी

शुभ दिपावली

अभिनंदन केले पाहिजे

गणपती बाप्पा मोरया...

तूच तुझी वैरी

एक छोटासा प्रयत्न

त्या आठवणी...