एक किस्सा

माझे मित्र रविंद् सरांनी सांगितलेला एक किस्सा काल एका मित्राने घरी बोलावले होते.सत्यनारायणाची महापुजा होती त्याच्याकडे.म्हटलं..ठीक आहे..तुझी इच्छाच आहे तर तो शिरा खायला येतो.मला खुप आवडतो..गेलो..!
तो मित्र आणि त्याची बायको पुजेला बसले होते.भटजी साधू वाण्याची कथा सांगत होते.तो मित्र पुजा सुरु असतानाच मंडप-लाईट-डेकोरेटर्सना आवश्यक सुचना करत होता..! आल्या-गेल्या पाहुण्यांची विचारपुस करत होता..! अधेमधे भटजींनी सांगितलेल्या सुचना ऐकत होता..!
अशीच पुजा संपली..आरती झाली.!
मी मित्राला विचारलं,“तु पुजा ऐकत नव्हतास.. आजूबाजूचे कोणीही लक्ष देवून ऐकत नव्हते..मग हे थोतांड कशासाठी..?
तो म्हटला,अरे वेड्या..सत्यनारायण निव्वळ बहाणा असतो रे..लोकांना घरी बोलावण्याचा..केवळ एक निमित्त..हे आमंत्रण सहसा लोक टाळत नाहीत.. म्हणुन..!
म्हटलं,अरे कोपेल ना तुझ्यावर तो अशाने..! म्हटला,अरे सतरा वर्ष झाली..हे करतोय..पुजा एकदाही ऐकली नाही..आणि कोपही झाला नाही..! सत्यनारायणापुढे मी हात जोडले नव्हते..पण या मित्राला मात्र साष्टांग लोटांगण घातले..!!

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

गणपती बाप्पा मोरया...

मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा...

आमची बोली भाषा - अहिराणी

बॅड पॅच

त्या आठवणी...

मनातलं मन...

सहज सुचली म्हणून....

एक छोटासा प्रयत्न

अभिनंदन केले पाहिजे