हे जिवन सुंदर आहे

एक छोटी " बी" रूजताना कधीच आवाज होत नाही,परंतु वृक्ष उन्मळून पडताना प्रचंड आवाज होतो....विनाश नेहमीच भयंकर असतो आणि निर्मिती ही नेहमी शांतपणे होत असते,म्हणूनच नेहमी शांतपणे विचार करा व मोठे होऊन यशस्वी व्हा.... आयुष्याची किंमत लोकांना कळत नाही. छोट्या-मोठ्या कारणाने लोकं आयुष्य संपवतात, नाहीतर मग रडत तरी घालवतात.
   बॉयफ्रेंड लग्नाला नाही म्हणाला, गर्लफ्रेंड सोडून गेली, नवरा-बायकोचं पटत नाही  ….की मग अजून काही. आत्महत्या करणाऱ्या / रडणाऱ्या लोकांना काहीही कारणं चालतात. पण जगण्यासाठी एक कारणही त्यांना मिळू नये ? आयुष्य फार सोप्पं आहे. आपणच नको त्या गोष्टींचा गुंता वाढवून घेतो. आपली हाव आपल्याला कंट्रोल होत नाही. आपल्याला हे पण पाहिजे, ते पण पाहिजे … असं करत आपण नुसतं धावत राहतो. पण कधी शांतपणे पाच मिनिटंही आपण आयुष्याबद्दल विचार करतो का ?                                  नवरा असो, बायको असो, आई असो, बाप असो, मुलं असो … की अजून कोणी. तुमच्या आयुष्यावर फक्त तुमचा अधिकार आहे. आणि ते आयुष्य कसं घालवायचं हा निर्णयही सर्वस्वी तुमचाच आहे. आपल्याला आयुष्यात सगळंच मिळणार नाही, 
माणसाच्या भावना विचित्र आहेत. आज आनंदी, उद्या दु:खी तर परवा अजून काहीतरी. या भावनेच्या आपण आहारी जावू नये, म्हणून स्वत:शी स्वत:ला बोलता यायला हवं. स्वत:चं ब्रेनवॉश करता यायला हवं. कधी आत्महत्येचा विचार मनात आलाच तर 'त्याने साध्य काय होईल', हा प्रश्न स्वत:ला विचारून पाहायला हवा. भावना खूप क्षणिक असतात, भानानांना कधी ओवरटेक करून देऊ नका.
हे मी लाख वेळा म्हणेन, "आयुष्य खूप सुंदर आहे."

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

"महाराष्ट्राची कुलस्वामिनी" तुळजाभवानी मंदिर पाचपाखाडी गणेशगल्ली ठाणे

        ठाणे शहर हे निसर्गसंपन्न, ऐतिहासिक आणि सांस्कृतिक दृष्टिकोनातून समृद्ध शहर आहे.ठाणे हे फक्त निवासी ठिकाण नसून ते निसर्ग,...