बॅड पॅच
बॅड पॅच एक संघर्ष
प्रत्येकाच्या आयुष्यात किमान एक तरी 'बॅड पॅच' येतो.शांत सुरळीत सुरु असलेल्या सन आयुष्यात, करीयर मध्ये काहीतरी बिघडतं,
नात्यांमध्ये काहीतरी बिघडतं,
व्यवहारांचा काहीतरी लोच्या होतो,
पैशांची बिकट वाट लागते...नड येते आणि बहुदा हे सारं एकदमच, एकाच वेळी घडतं!! हा असा बॅड पॅच आला की तो आपल्या आयुष्यात महिना दोन महिने किंवा क्वचित दोन चार वर्षंही रेंगाळतो... आपलं आयुष्य आंतर्बाह्य हालवून टाकतो... आयुष्य नको करुन सोडतो...आपण कितीही नको म्हणलं, टाळायचं ठरवलं तरी हा असा बॅड पॅच येतो.... ...
संपूर्ण आयुष्यात एक-दोन-चार-सहा कितीही वेळा येतो... अन आपल्याला तो भोगावा, अनुभवावाच लागतो...कितीही नकोसा वाटला, कितीही त्रास झाला तरी या बॅड पॅचचे काही विलक्षण फायदेही असतात!!
यातले दोन प्रमुख फायदे म्हणजे:
१. खरोखर आपलं कोण आहे आणि कोण नाही हे बॅडपॅच असतानाच कळतं... आपल्या वाईट आणि पडत्या काळातही कोण आपल्या सोबत खंबीरपणे उभं रहातं, कोण आपला हात सोडत नाही, कोण आपल्या पाठीशी आधार देत उभं रहातं हे फक्त बॅडपॅच असतानाच उमगतं!
२. आपली स्वतःची आपल्याला नव्यानं ओळख होत रहाते.
अत्यंत वाईत परिस्थितीत आणि प्रसंगांत आपण कसे वागतो,
काय बोलतो, काय करतो,
काय निर्णय घेतो
हे आपलं आपल्याला समजू शकतं..
आपली शक्तीस्थळं आणि मर्यादा यांची नव्यानं जाणीव होते
स्वतःविषयीचा विश्वास वाढतो आणि जगण्याविषयीची नम्रताही येत रहाते...!अर्थात, बॅडपॅच येणंही आपल्या हातात नाही आणि टाळणंही आपल्या हातात नाही... पण तो जेंव्हा येतो तेंव्हा त्याला प्रतिसाद कसा द्यायचा react कसं करायचं हे आपल्या हातात असतं... आपला बॅडपॅच आहे नाकारून उद्दामपणे जगत रहायचं आणि स्वतःचं नुकसान करत रहायचं का तो स्वीकारून नम्र व्हायचं, आत्मपरीक्षण करायचं आणि स्वतःत बदल घडवत सजग जगायचं हे आपल्याच हातात असतं!!असो... आपणा सर्वांच्या आयुष्यात कमित कमी बॅडपॅच येवोत आणि जे येतीलच त्यांमधून आपलं आयुष्य अधिकाधिक समृद्ध करण्याची ताकद आपणां सर्वांना लाभो...!

टिप्पण्या