तिरूपती बालाजी मंदिर

तिरुपती भगवान व्यंकटेश्वर मूर्तीच्या या गोष्टी कदाचित तुम्हाला माहिती नसाव्यात
तिरुमला व्यंकटेश्वर म्हणजे तिरुपती बालाजी मंदिर आंध्रप्रदेशातील तिरुमला पर्वत रांगामध्ये वसलेले आहे. हे मंदिर भारतात सर्वात प्राचीन आणि श्रीमंत मदिर रुपात ओळखले जाते. या मंदिराशी संबंधित विविध मान्यता असून यामधील काही खास गोष्टींची आज आम्ही तुम्हाला माहिती सांगत आहोत. या गोष्टी तुम्हाला कदाचित पटणार नाहीत पंरतु बालाजीचे भक्त या गोष्टींवर पूर्ण विश्वास ठेवतात...
मान्यता नंबर 1.
या मंदिरात भगवान व्यंकटेश्वराच्या मूर्तीवर असलेले केस खरे आहेत. असे मानले जाते की, या केसांचा कधीही गुंता होत नाही आणि हे नेहमी मुलायम राहतात.
मान्यता नंबर 2.
व्यंकटेश्वर बालाजी मूर्तीचा मागील भाग नेहमी ओलसर राहतो. ध्यानपूर्वक कान लावून ऐकल्यास समुद्राचा आवाज ऐकू येतो.
मान्यता नंबर 3
मंदिराच्या दरवाजाच्या उजव्या बाजूला एक छडी आहे. असे मानले जाते की, या छडीचा उपयोग देवाच्या बाल रुपाला मारण्यासाठी केला गेला होता. तेव्हा त्यांच्या हनुवटीला जखम झाली होती. यामुळे बालाजीच्या हनुवटीवर चंदन लावण्याची प्रथा सुरु झाली.
मान्यता नंबर 4
बालाजी मंदिरातील गाभाऱ्यातील देवाच्या मूर्तीकडे पाहिल्यास मूर्ती गाभाऱ्याच्या मधोमध दिसते, परंतु वास्तवामध्ये तुम्ही बाहेर उभे राहून पाहिल्यास ही मूर्ती गाभाऱ्यात उजव्या बाजूला स्थित असलेली दिसते
मान्यता नंबर 5
गुरुवारी भगवान व्यंकटेश्वराच्या मूर्तीला पांढरे चंदन लावले जाते. दुसऱ्या दिवशी  हा लेप काढून टाकल्यानंतर मूर्तीवर देवी लक्ष्मीचे चिन्ह उमटलेले असतात.
मान्यता नंबर 6
मूर्तीवर अर्पण करण्यात येणारे सर्व फुले आणि तुळशीची पाने भक्तांना परत न देता, सर्व सामग्री बारीक करून मंदिराच्या मागे असलेल्या विहिरीमध्ये टाकली जाते.
मान्यता नंबर 7
मंदिरातील पुजारी दिवसभर मूर्तीवर अर्पण झालेली फुले मागे फेकत राहतात, अर्पण केलेल्या फुलांकडे पाहत नाहीत. कारण या फुलांकडे पाहणे चांगले मानले जात नाही.
मान्यता नंबर 8
या मंदिरात एक दिवा हजारो वर्षांपासून प्रज्वलित असून हा दिवा कोणी लावला आणि केव्हापासून चालू आहे कोणालाही माहिती नाही.
मान्यता नंबर 9
स्थानिक मान्यतेनुसार, 18 व्या शतकात हे मंदिर 12 वर्ष बंद ठेवण्यात आले होते. त्या काळात एका राजाने 12 लोकांना मृत्युदंड दिला आणि सर्वांचे शव मंदिरावर लटकवले होते. असे म्हणतात की, त्यावेळी व्यंकटेश्वर स्वामी प्रकट झाले होते.
मान्यता नंबर 10
या मंदिरापासून 23 किलोमीटर अतंरावर एक गाव आहे. या गावामध्ये निवास करणारे लोकच फक्त गावात ये-जा करू शकतात. हे लोक कडक नियमांचे पालन करत जीवन व्यतीत करतात. याच गावामधून भगवान व्यंकटेश्वरासाठी फुल, दुध, तूप, लोणी इ. सामग्री आणली जाते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

"महाराष्ट्राची कुलस्वामिनी" तुळजाभवानी मंदिर पाचपाखाडी गणेशगल्ली ठाणे

        ठाणे शहर हे निसर्गसंपन्न, ऐतिहासिक आणि सांस्कृतिक दृष्टिकोनातून समृद्ध शहर आहे.ठाणे हे फक्त निवासी ठिकाण नसून ते निसर्ग,...