मिसळ पाव

॥ मिसळ पाव ॥
आयुष्य एक मिसळ आहे,
ज्यात सुखाचे मोड आलेले
मुग आणि मठ शोधावे लागतात.
असंख्य अनुभवांचं फरसाणच
अधिक असतं.
ढिगभर आणि डिशभर दु:खाचा
कांदा डोळ्यात पाणी आणतो.
स्नेह,प्रेम, आपुलकी यांची
हिरवीगार कोंथिंबीर
मिसळीची शोभा वाढवते.
मतभेदांचं दही, लिंबू
जिभेला चरका मारतं,
तरी ते हवं असतं.
स्वप्नांच्या ठिसूळ पापडाचे
क्षणात तुकडे तुकडे होतात.
मनोरथांच्या रश्शात मनाचा पाव
जितका बुडवावा तितका तो
फुगत जातो.
शेवटी जिवाच्या मित्रांबरोबर
अशा मिसळीची लज्जत चाखण्यात
खरी मजा असते.
आणि अशावेळी हातातला
स्टीलचा चमचादेखील
सोन्याचा होऊन जातो.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

गणपती बाप्पा मोरया...

मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा...

आमची बोली भाषा - अहिराणी

बॅड पॅच

त्या आठवणी...

मनातलं मन...

सहज सुचली म्हणून....

एक छोटासा प्रयत्न

अभिनंदन केले पाहिजे