एक विनंती आहे

  हा सर्व फळांचा ऋतू आहे. म्हणजेच आंबा ,जांबुळ , सिताफळ इत्यादि . माझी सर्वांना विनंती आहे की या फळांचा जेंव्हा तुम्ही आस्वाद घ्याल व उरलेले  बी कुठेही इतरत्र न टाकता, या बिया स्वच्छ करुन आणि एका प्लास्टिक बॅग मध्ये ठेवा व ती तुमच्या कार (Car) किंवा गाडीमध्ये ठेवा . बरेच लोक या उन्हाळी सुट्टी मध्ये पर्यटनाला जातात. तुम्ही ही गेलाच आणि प्रवासा दरम्यान  जर तुम्हाला ओसाड जागा पहावयास मिळाली तर या बिया तुम्ही त्या ठिकाणी टाकून दया.असे केल्यामुळे येणाऱ्या पावसाळ्यात या बिया रुजल्या जातील व त्या बियाची नविन रोप तयार होईल.
  अशा पद्धतीने आपल्या सर्वांकडून एका जरी रोपाच ( बियाचे) रूपांतर झाडामध्ये झाले तर आपले Mission पूर्ण होईल .असे प्रयोग खुप वर्षापासून सातारा आणि रत्नागिरी भागामध्ये सुरू  आहेत.
याप्रकारे बाकी अनेक जिल्ह्यांमध्ये अशा  कल्पना लोकांच्या पर्यंत पोहचवुन लोकांना जागृत केल जात आहे आणि कित्येक लोक या मिशन मध्ये सामील ही झाले आहेत....
माझी सर्वाना विनंती आहे व सांगण्यास उत्स्तुकता ही वाटते की आपणही या Mission मध्ये सामील होऊ आणि आपल्या येणाऱ्या पुढच्या पिढीला एका नव्या हिरवळ जगाच. दर्शन घडवू .

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा...

आमची बोली भाषा - अहिराणी

शुभ दिपावली

अभिनंदन केले पाहिजे

त्या आठवणी...

गणपती बाप्पा मोरया...

एक छोटासा प्रयत्न

तूच तुझी वैरी