सहा षटकारांचे गुपित

     अशक्य असे जगात काहीच नसते कोणाला स्वप्नात सुद्धा वाटले नव्हते की स्टुअर्ट सारख्या वेगवान गोलंदाजी करणा-याला सहा चेंडूत सहा षटकार मारणे युवराजला पण ती मॅच होण्याअगोदर जर कोणी मुलाखतीत जर हा प्रश्न विचारला असता वेगवान गोलंदाजी करणा-याला तु सहा चेंडूत सहा षटकार मारशील का तर तोही  विचारात पडला असता.
  प्रत्येक नावजलेल्या क्रिकेटपटूच्या जीवनाशी अशी एक खेळी जोडलेली असते की त्याचं नाव उच्चारलं की ती खेळी सहज आठवते. युवराज सिंग नाव घेताच त्यानं एकाच षटकात ठोकलेल्या सहा षटकारांचे गुपित अखेर युवराजने एका मुलाखत मध्ये सांगितले 
     युवाराजनं २००७ मधील टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेदरम्यान इंग्लंडचा गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडच्या एका षटकात सहा षटकार खेचत इतिहास रचला. जणू एखाद्याचा बदला घ्यावा अशाच भावना त्याच्या चेहऱ्यावर दिसत होत्या. त्याचा चेहरा गंभीर आणि नजर चेंडूवर पक्की बसली होती. आलेला प्रत्येक चेंडू विना अडथळा सीमापार करायचा अशाच पद्धतीने तो फटके लगावत होता. युवराजच्या या तडाखेबंद खेळीला कारणीभूत होती फ्लिंटॉफनं केलेली शेरेबाजी.
     तुला चांगले फटके खेळताच येत नाही, तू अत्यंत वाईट खेळतोस, असं फ्लिंटॉफ युवराज ला म्हणाला होता.त्याचा सगळा राग त्याने गोलंदाजी करण्यास आलेला स्टुअर्ट वर काढला.फिरकी गोलंदाजी करणा-याला एक वेळ सहा चेंडूत सहा षटकार मारण्याचा प्रयत्न होऊ शकतो पण वेगवान गोलंदाजाला सहा वेळा चेंडू सीमापार पाठविणे सोपे नाही आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा...

आमची बोली भाषा - अहिराणी

शुभ दिपावली

अभिनंदन केले पाहिजे

गणपती बाप्पा मोरया...

तूच तुझी वैरी

एक छोटासा प्रयत्न

त्या आठवणी...