गोष्ट एका मिस्ड काॅलची

     गोष्ट ऐकायला कोणाला आवडत नाही लहान मुले असो किंवा अगदी आजी - आजोबा असोत... एवढेच नव्हे तर प्रत्येक मोठ्या माणसात एक लहान मूल दडलेले असते आणि कोणी तरी गोष्ट ऐकवा असे बच्चे कंपनी कडून कमी जास्त प्रमाणात हट्ट हा नेहमी होत असतो. आता हाच हट्ट पुरवून घेण्यासाठी एका मिस्ड काॅलवर मोफत ऐकण्याची सोय ' प्रथम बुक्स ' ने केली आहे. यासाठी 080-392-36222 हा क्रमांक उपलब्ध करुन देण्यात आला आहे. यात मराठी हिंदी इंग्रजी कन्नड आणि तेलगू भाषेत लहान मुलांसाठी विविध गोष्टी ऐकायला मिळणार आहे. तीही चार ते पाच मिनीटांची लहान मुलांना गोष्ट वाचण्यापेक्षा कोणी तरी गोष्ट सांगणे हा त्यांच्या आनंदाचा भाग असतो.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

"महाराष्ट्राची कुलस्वामिनी" तुळजाभवानी मंदिर पाचपाखाडी गणेशगल्ली ठाणे

        ठाणे शहर हे निसर्गसंपन्न, ऐतिहासिक आणि सांस्कृतिक दृष्टिकोनातून समृद्ध शहर आहे.ठाणे हे फक्त निवासी ठिकाण नसून ते निसर्ग,...