दंतकथा
प्रत्युषा बनर्जी एक चांगली अभिनेत्री होती. कलर्स वर प्रसारित होणारी मालिका बालिका वधु मध्ये
आनंदीची भूमिका करत होती. तसेच रियलिटी शो झलक दिखला मधे सीजन 5 आणि बिग बॉस सीजन 7 मधे ती सहभागी झाली होती. तीचा मृत्यु 1 अप्रैल 2016 रोजी तीच्या राहत्या घरी अंधेरीत झाला.
प्रत्युषा बॅनर्जी आणि जिया खानच्या जाण्याने अवघे बाॅलिवूड हादरले. मात्र असा अकाली आणि अनपेक्षितपणे स्वतः च्या जीवनाचा अंत करणारी ती एकटीच नव्हती. नैराश्य, खाजगी आणि व्यावसायिक आयुष्यातील अपयश, एकटेपणा यांमुळे जीवनाला कंटाळलेले अनेक कलाकार बाॅलिवूडने पाहिले. यापैकी काहीच्या मृत्यूबद्दल आजही दंतकथा ऐकायला मिळतात.यात अंत्यत मनस्वी अशा गुरूदत्तपासून दाक्षिणात्य चित्रपटांमधील 'चटकचांदणी' म्हणून ओळखल्या जाणा-या सिल्क स्मितापर्यंत अनेक कलाकारांचा समावेश आहे ....
निराशेच्या गर्तेत निखळलेले तारे...
गुरूदत्त : चित्रपटसृष्टीला धक्का देणारा मृत्यू म्हणजे अत्यंत मनस्वी आणि कलंदर अशा गुरूदत्त यांचे निधन ! यशाच्या शिखरावर असताना अतिशय कमी वयात त्यांचा मृत्यू झाला. दारू आणि झोपेच्या गोळ्या यांचे अतिरिक्त सेवन केल्याने त्यांचे निधन झाले होते. त्याआधी त्यांनी तीन वेळा आत्महत्येचा प्रयत्न केला होता.
मनमोहन देसाई : 'अमर अकबर अॅन्थनी',
कुली,परवरिश सारख्या चित्रपटांनी एक काळ गाजवणारे मनमोहन देसाई यांचा मृत्यू ग्रँट रोड येथील त्यांच्या इमारतीतून खाली पडून झाला. काही चित्रपट न चालल्याने नैराश्याने ग्रासले जाऊन त्यांनी हे पाऊल उचलले, अशी एक वदंता आहे. तर पाठीच्या दुखण्यामुळे त्यांना स्वतःचा तोल सावरता आल नाही, आणि ते इमारतीवरून पडले, असेही बोलले जाते.
कुणाल सिंग : 'दिल ही दिल में ' या चित्रपटातील 'ए नाझनी सुनों ना या गाण्यामुळे अल्पावधीतच तरुणींच्या मनात स्थान पटकावणा-या कुणाल सिंग यानेही गळफास लावून मृत्यूला कवटाळले मात्र त्याच्या वडिलांच्या म्हणण्यानुसार ती आत्महत्या नसून तर कुणालचा खून झाला होता . याबाबत काहीच माहिती पुढे आली नाही आणि चित्रपटसृष्टीत मृत्यूभोवतीच्या दंतकथेत वाढ झाली.
परवीन बाबी : प्रसिद्धीच्या झोतातील कलाकार आयुष्याच्या उत्तरार्धात अनेकदा एकाकी पडतात.तीच्या मृत्यूने ही बाब अधोरेखित केली. तिचा मृत्यू उघडकीस आला, तोदेखील तीन दिवसांनी. तिच्या
सोसायटीच्या सभासदाला घराच्या दरवाजाबाहेर वर्तमानपत्रांची भेंडोळी आणि दुधाच्या बाटल्या दिसल्या त्या वेळी ! शेवटच्या काही दिवसांत तिची मनोदशा अस्थिर झाली होती.
नेहा सांवत : ही 11 वर्षांची चिमुकली 'बुगी वूगा' या गाजलेल्या नृत्य रिअॅलिटी शोमध्ये सहभागी झालेली नृत्यनिपुण कलावंत. अभ्यास आणि नृत्याचा क्लास सांभाळून ती शोमध्ये नृत्य करायची. पण आई-बाबांनी अभ्यासाकडे लक्ष देता यावे म्हणून नृत्य करण्यास मज्जाव केला. चिमुकलीने 4 जानेवारी 2010 रोजी आपल्या घरीच गळफास लावून आत्महत्या केली.
जिया खान : बाॅलिवूडमध्ये जियाला आणले निर्माता- दिग्दर्शक रामगोपाल वर्माने. जिया लंडनमध्येच वाढली.''दिल से' चित्रपटात तीने बालकलाकाराची भूमिका केली होती . सोळाव्या वर्षी विक्रम भट्टच्या 'तुमसा नही देखा' साठी विचारणा झाली होती. त्यानंतर दोन वर्षानी 2007 मध्ये अमिताभ बच्चन यांच्या 'नि:शब्द मध्ये तिला संधी मिळाली तीचा पहिलाच चित्रपट तोही रामगोपाल वर्माचा, त्यात बोल्ड विषय आणि नायक म्हणून थेट अमिताभ ! जियासारखी नशीबवान कलाकार नाही, अशी चर्चा त्यावेळी झाली. हा चित्रपट आपटला तरी तीच्या बोल्ड अवताराची आणि तीच्या अभिनयाची वाहवा झाली. त्यानंतर ती दिसली आमिर खानबरोबर 'गजनी' मध्ये तिचा अखेरचा चित्रपट ठरला तो 2010 चा अक्षय कुमारबरोबरचा 'हाऊसफुल्ल' फिल्मी करिअरची सुरुवात चांगली झाली तरी त्यामुळे तिच्या अपेक्षा वाढल्या होत्या. त्या अपेक्षांजोगते काम मिळत नसल्याने तिला निराशेने गाठले आणि त्यानंतर मृत्यूने.....अवघ्या 18 वर्षी सुरू झालेली कारकीर्द, सहा वर्षात तीन चित्रपट आणि पदरी नाराशा घेऊन संपवलेले आयुष्य तीचा प्रवास सर्वांना नि:शब्द करून गेला आहे. ग्लॅमर जगतातील ताण तणाव, असुरक्षिता, तडजोडी कुणाचीच मदत न मिळाल्यास येणारी निराशा आणि त्यातून होणारी शोकांतिका. त्यामुळे 'लाईट्स - कॅमेरा - अॅक्शन' च्या झगमगाटाखाली दडलेले निर्दय वास्तव उघडे पडले आहे.
दिव्या भारती : वयाची विशी गाठायच्या आधीच
' विश्वात्मा' दिवाना 'शोला और शबनम' अशा सुपरहिट चित्रपटांमध्ये झळकलेल्या दिव्या भारतीचा आकस्मिक मृत्यू झाला. 1993 मध्ये ती इमारतीच्या 5 व्या मजल्यावव्रून खाली पडून दगावली. तीचा तोल गेला, तिला कोणी ढकलले, तिने आत्महत्या केली याबाबतचे गूढ अजूनही कायम आहे. अवघ्या 19 वर्षांच्या या आभिनेत्रीचा मृत्यू चटका लावून गेला.
सिल्क स्मिता : आपल्या मादक अदांनी घायाळ
करणा-या विजयालक्ष्मी ऊर्फ सिल्क स्मिताने 1996 मध्ये विष पिऊन आत्महत्या केली. आपल्या 17 वर्षांच्या चित्रपट कारकीर्दीत 450 हून अधिक चित्रपटांमध्ये ' हॉट सीन्स ' मुळे गाजलेल्या सिल्कला निर्माती झाल्यावर मात्र अपयश आले आणि तिने हे पाऊल केवळ नैराश्य, तणाव, प्रेमभंग, अपयश आणि दारू यांमुळे केल्याचे बोलले जाते.
टिप्पण्या