अभिनंदन केले पाहिजे

   प्रशासकीय अधिका-याने ठरविले तर तो काहीही करू शकतो, हे गेले दीड वर्ष ठाणे जिल्हाधिकारीपदाचा कार्यभार सांभाळणा-या डॉक्टर अश्विनी जोशी यांनी अत्यंत चांगले प्रकारे दाखवून दिले त्याबद्दल त्याचे खूप खूप आभार. पूर्वीच्या काळी गुंडांकडून शासकीय अधिका-यांना त्रास होत होता पण आता हे चित्र उलटे पहावयास मिळते ज्या लोकांनी प्रतिनिधी म्हणून निवडून दिले आहे त्यांच्याकडून आता त्रास व्हायला लागला आहे असे नेतृत्व काय कामाचे.डॉ. अश्विनी जोशी यांनी कणखर कल्पक आणि कार्यकुशल नेतृत्वाने जिल्हाधिकारी कार्यलयाच्या कारभाराला काॅर्पोरेट शिस्त लावली. वन बंधा-यापासून टाऊन हाॅलपर्यंत विविध कामे मार्गी लावली.मात्र ज्यांचे हितसंबंध धोक्यात आले त्यांनी लगेचच राजकीय दडपण आणून त्यांना हटविले.
    पुर्ण ठाणे जिल्ह्यातील भुमाफीया,अनधिकृत कामं करणारे लोक,खाड्या बुजवून चाळी-गोडाऊन उभारणारे,पर्यावरणाचा सत्यानाश करणारे,अवैध रेती उत्खनन करुन शासनाचा करोंडोंचा महसूल बुडवणारे,अनधिकृत केबल व्यावसायिक आदी सर्व घटकांना कायद्याचा चाप लावून त्यांचे सर्व गैर धंदे बंद पाडून सर्व सामान्यांना दिलासा देणा-या आणि ठाणे जिल्ह्यात कायद्याचे राज्य प्रस्थापित करणा-या धडाडीच्या जिल्हाधिकारी डॉ.अश्विनी जोशी यांची अवघ्या दीड वर्षात ठाण्यातून उचलबांगडी करुन पुन्हा हा जिल्हा विविध माफीयांच्या हाती देण्याचा अतिशय विधायक निर्णय घेतल्याबद्दल आपले हार्दिक अभिनंदन..! तमाम ठाणे जिल्हावासीयांच्या वतीने आपणास मनापासून धन्यवाद..!!

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा...

आमची बोली भाषा - अहिराणी

शुभ दिपावली

गणपती बाप्पा मोरया...

तूच तुझी वैरी

एक छोटासा प्रयत्न

त्या आठवणी...