शोध वडापावचा

     आपण सकाळ-संध्याकाळी पोटाची भूक भागवण्यासाठी 'वडापाव' खातो, अगदी स्वस्तात मिळणारे हे अन्न आणि चालता पळता ते खाऊ शकतो, यामुळे वडापाव खुप प्रसिद्ध आहे. पण या वडापावचा शोध कोणी लावला ? याचा कधी विचार केला आहे का ? Being Marathi टिम आपणास वडापावचा ज्यांनी शोध लावला त्या कमलाबाई ओगले यांची ओळख करून देत आहे.. 1965-70 चा तो काळ होता, कमलाबाई मुंबईतील दादर येथे राहत होत्या,उन्हाळ्याचे दिवस होते, पाव्हणे घरी आले म्हणून त्यांनी स्वयंपाक केला होता. बटाट्याची सुकी भाजी, भजे,पुरणपोळी वगैरे.. स्वयंपाक करताना त्यांनी बटाट्याची सुकी भाजी भज्याच्या पिठात टाकून तेलात सोडली, तर एक वेगळाच पदार्थ तयार झाला. त्यांनी तो पदार्थ खाऊन बघितला तर अगदी खमंग लागला. त्यांनी त्याला 'वडा' हे नाव दिले. नविन पदार्थ असल्यामुळे त्यांनी तो लोकांना खाण्यासाठी उपलब्ध करून द्यायच्या हेतूने घरापुढेच विकण्यास मांडला, जेव्हा लोक येऊन खाऊ लागले तर लोकांनाही खुप आवडला, पुढे पुढे मारवाडी हाॅटेलवाल्यांनी त्यांची ही कल्पना चोरली आणी त्यांच्या नावाने मुंबईत वडे विकू लागले. त्या सोबत सुरवातीला चपाती देत असत, धावपळीच्या मुंबई मधे चपाती सोबत कशी न्यावी म्हणून चहासोबतच्या पावासोबत वडा विकला जाऊ लागला. त्यांची कलाकृती चोरली हे पाहील्यानंतर त्यांनी 'रूचिरा' हा पाककृतीचा छोटेखानी पुस्तीका लिहली, आजही पाककृती मधे 'कमलाबाई ओगले' यांच्या 'रूचिरा' चा विक्रम कोणी मोडू शकले नाही. अशा या आज्जीचा  वयाच्या 86 व्या वर्षी 1999 साली पुण्यात निधन झाले. आज या आज्जीबद्दल कोणाला माहीत नाही म्हणून Being Marathi टीम तूम्हास ओळख करून देत आहे..

कृपया जरूर शेअर करा...

(माहीती Copy करताना पेजचे नाव जरूर टाका, आम्ही शोध घेऊन ही माहीती संकलीत केली आहे )

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

गणपती बाप्पा मोरया...

सहज सुचली म्हणून....

त्या आठवणी...

अभिनंदन केले पाहिजे

आमची बोली भाषा - अहिराणी

मोठे रॅकेट...

दंतकथा

एक छोटासा प्रयत्न

विंचू