प्रसिद्धी साठी सर्व काही

भारतीय जनता पक्षाच्या नगरसेविका आणि मुंबई महानगरपालिकेच्या महिला व बालविकास समितीच्या अध्यक्षा राजश्री शिरवडकर यांच्या एका फोटोमुळे एक नवा वाद निर्माण झाला आहे. महाराष्ट्र दिनानिमित्त आयोजित एका कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराजांच्या खांद्यावर हात ठेवून उभ्या असलेला त्यांचा फोटो सध्या सोशल मिडियावर व्हायरल होऊ लागला आहे. अशा प्रकारे शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर हात ठेवून उभ्या राहिल्याने त्यांच्यावर टीका होऊ लागली आहे.
हेच अपेक्षित आहे या पक्षाकडून. पक्षाच्या छुप्या अजेंड्यावर जे आहे तेच यांच्या  वागण्यातुन दिसून आले आहे.. महाराजांच्याबद्दल यांच्या मनात काय आहे हे असे समोर येते. गरज आहे जे शिवरायांचे नाव घेऊन राज्य करताहेत अशांसोबत महाराजांच्या मावळ्यांनी राहायचे  कीं नाही.सोबतच लोकसभा निवडणुकीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने प्रचार करणा-या भाजपा पक्षावरही यानिमित्ताने सोशल मिडियावरुन टीका करण्यात येत आहे. लोकसभा निवडणुकीत 'छत्रपतींचा आशीर्वाद चलो मोदी के साथ' असा नाराच भाजपाने दिला होता. प्रसिद्धी करीता सर्व काही. ... यांना इतिहास तरी माहिती आहे का ?  असा बालविकास करणार का ? आधी पंकजा मुंडे यांनी सेल्फी काढून सगळ्यांना बोलायला संधी दिली आणि आता यांनी काय म्हणायच यांना फारच शरमेची बाब आहे.

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

"महाराष्ट्राची कुलस्वामिनी" तुळजाभवानी मंदिर पाचपाखाडी गणेशगल्ली ठाणे

        ठाणे शहर हे निसर्गसंपन्न, ऐतिहासिक आणि सांस्कृतिक दृष्टिकोनातून समृद्ध शहर आहे.ठाणे हे फक्त निवासी ठिकाण नसून ते निसर्ग,...