एक विक्रम कमी

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या विक्रमांच्या यादीतून एक विक्रम कमी होण्याची चिन्हे दिसत आहे. इंग्लंडचा कर्णधार अॅलिस्टर कूक लवकरच सचिनचा ११ वर्षं जुना विक्रम मोडणार आहे. कसोटी क्रिकेटमध्ये दहा हजार धावा करणारा सर्वात कमी वयाचा खेळाडू म्हणून सचिनच्या जागी आता कूकचे नाव घेतले जाईल.
१९ मेपासून इंग्लंड आणि श्रीलंकेदरम्यान इंग्लडमध्ये तीन सामन्यांची कसोटी मालिका सुरू होत आहे. आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेटमध्ये दहा हजार धावा पूर्ण करण्यासाठी कूकला फक्त ३६ धावांची गरज आहे. सध्याचा स्थानिक क्रिकेटमधील त्याचा फॉर्म पाहता, तो त्या पहिल्याच सामन्यात करेल, असं दिसतंय. म्हणजेच, कारकीर्दीतील १२७व्या कसोटी कूक दहा हजार धावांचा टप्पा पार करून जगातील सर्वात तरुण फलंदाज ठरेल.
  गेली ११ वर्षं हा विक्रम भारताच्या सचिन तेंडुलकरच्या नावावर आहे. सचिनने २००६मध्ये पाकिस्तानविरुद्ध झालेल्या कसोटीमधील दोन्ही डावांमध्ये प्रत्येकी ५२ धावा करून १० हजार धावांचा टप्पा गाठला होता. त्यावेळी त्याचं वय ३१ वर्षं १० महिने इतकं होते. कूकचं आजचं वय ३१ वर्षं ४ महिने आहे. त्यामुळे १९ ते २३ मे दरम्यानच्या कसोटीत त्यानं ३६ धावा केल्यास तो १० हजार धावांचा पल्ला पार करणारा सर्वात तरुण फलंदाज ठरेल.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

"महाराष्ट्राची कुलस्वामिनी" तुळजाभवानी मंदिर पाचपाखाडी गणेशगल्ली ठाणे

        ठाणे शहर हे निसर्गसंपन्न, ऐतिहासिक आणि सांस्कृतिक दृष्टिकोनातून समृद्ध शहर आहे.ठाणे हे फक्त निवासी ठिकाण नसून ते निसर्ग,...