शिफारस

    भारताचा कसोटी कर्णधार आणि धावांची मशीन अशी बिरुदावली मिरवणा-या विराट कोहलीची राजीव गांधी खेलरत्न आणि तंत्रशुद्ध फंलदाज अजिंक्य रहाणेची अर्जुन पुरस्कारासाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने शिफारस केली आहे. गेल्या चार वर्षांमध्ये खेलरत्न पुरस्कारासाठी पहिल्यांदा शिफारस केली आहे हे नवलच आहे देर आये दुरुस्त आये असेच आता म्हणावे लागेल.
    विराट कोहली तुफानच खेळतो यात काहीच शंका नाही. गेली अनेक वर्षे त्याच्या कामगिरीत सातत्य दिसते आहे कसोटी, वनडे असो किंवा टी - 20 त्याच्या धावांची चक्की सुरूच आहे. आयपीएलमध्ये शतक ठोकणारा विराट कोहली हा 11 भारतीय आहे तसेच शतक करणारा चौथा कर्णधार ठरला आहे. वीरेंद्र सेहवाग व मुरली विजय या भारतीयांच्या नावावर दोन शतके आहेत. यंदाच्या आयपीएलमध्ये सात शतकी भागीदारी झाल्या असून त्यातील चार भागीदारींमध्ये विराट कोहलीचा सिंहाचा वाटा आहे. फलंदाजी करताना डावाला 'फिनिशिंग टच' देणे विराटला उत्तम जमते.आयपीएल मधे 3504 धावा केल्या आहेत तसेच टी - 20 मध्ये आतापर्यंत 992 धावा फटकावल्या आहेत. 2013 च्या आयपीएल मोसमात दोनवेळा शतकाने हुलकावणी दिली आहे.                       नुकत्याच झालेल्या टी -20 कोहलीने नेत्रदीपक कामगिरी केली होती. या विश्वचषकात पारंपारिक प्रतिस्पर्धी पाकिस्तान आणि आॅस्टेलिया यांच्या विरुध्द कोहलीने सिंहाचा वाटा उचलला होता. आणि सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कारही कोहलीने पटकावला होता. 7.5 लाख रूपये रोख आणि सन्मानचिन्ह असे खेलरत्न पुरस्काराचे स्वरूप तर 5 लाख रुपये रोख आणि सन्मानचिन्ह असे अर्जून पुरस्कारचे स्वरूप आहे. जर कोहलीला खेलरत्न पुरस्कार मिळाला तर तो तिसरा क्रिकेटपटू ठरेल. यापूर्वी भारताचा माजी महान फंलदाज सचिन तेंडुलकर आणि सर्वात यशस्वी कर्णधार महेंद्रसिंग धोनी यांना खेलरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा...

आमची बोली भाषा - अहिराणी

शुभ दिपावली

अभिनंदन केले पाहिजे

त्या आठवणी...

गणपती बाप्पा मोरया...

एक छोटासा प्रयत्न

तूच तुझी वैरी