आता मिळणार आॅनलाइन

मुंबई पोलिसांकडून देण्यात येणाऱ्या चारित्र्य पडताळणीच्या दाखल्यासाठी यापुढे महिनाभर वाट पहावी लागणार नाही. पोलिसांच्या विशेष शाखा १ ने ही सेवा ऑनलाइन सुरू केल्याने अर्जदारांना आठ दिवसांत चारित्र्य पडताळणीचा दाखला मिळू शकणार आहे. पूर्वी हा दाखला मिळवण्यासाठी नागरिकांना मोठ्या प्रक्रियेला सामोरे जावे लागत होते. नव्याने सुरू केलेल्या ऑनलाइन सेवेमुळे नागरिकांचा वेळही वाचणार आहेत. 

पूर्वी चारित्र्याचा दाखला मिळवण्यासाठी पोलिसांच्या तीन ते चार वेबसाइटवरुन फॉर्म भरून त्यांची प्रिंट काढावी लागत होती. त्यानंतर मिळालेल्या तारखेला विशेष शाखा येथे जाऊन फॉर्म आण‌ि कागदपत्रे जमा करणे सक्तीचे होते. त्यानंतर ३ ते ४ दिवस संबंधित पोलिस ठाण्यात चारित्र्य पडताळणीच्या अहवालासाठी उपस्थित राहावे लागत असे. त्यानंतर ३० दिवसांनी नागरिकांना चारित्र्याचा दाखला मिळत होता. मात्र पोलिसांच्या विशेष शाखा १ ने www.pcsmahaonline.gov.in व www.aaplesarkar.mahaonline.gov.in ही नवीन संकेतस्थळे सुरू केली आहेत. 

नवीन प्रक्रियेतील टप्पे

- वरील दोन संकेतस्थळांवर अर्जदाराने माहिती भरावी 

- संबंधित पोलिस ठाण्यात चारित्र्य पडताळणीकरता उपस्थित रहावे 

- संबंधित पोलिस ठाण्याकडून चारित्र्य पडताळणी अहवाल ऑनलाइन अपलोड 

- अहवालासंदर्भात पडताळणी करून अर्जदाराचे चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र डिजिटल सहीद्वारे तयार 

- प्रमाणपत्र तयार झाल्याचा अर्जदारास मेसेज

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा...

आमची बोली भाषा - अहिराणी

शुभ दिपावली

अभिनंदन केले पाहिजे

गणपती बाप्पा मोरया...

तूच तुझी वैरी

एक छोटासा प्रयत्न

त्या आठवणी...