बिझनेस च्या नावाखाली

   कार्टून चॅनल्सनी आपली मर्यादा आेलांडायला सुरुवात केली आहे. मुलांचे मनोरंजन करतांना त्याच्यापुढे कोणत्या गोष्टी ठेवाव्यात याचे भान सुटत चालले आहे 'बिझनेस' च्या नावाखाली कार्टून चॅनल्स दिवसेंदिवस अधिक प्रक्षोभक आणि आक्रमक कार्यक्रम दाखवू लागल्या आहेत. यामुळे कोवळ्या मनावर चुकीचे संदेश पोहचण्याची भिती व्यक्त होऊ शकते. टीव्हीवर मुलांनी कोणती चॅनल्स पहावीत याबाबत बरेचसे पालक जागरूक असतात पण कार्टून चॅनल लागले की ते देखील निर्धास्त होतात कारण बाकी काही बघण्यापेक्षा कार्टून बरे असे
ब-याच पालकांना वाटते. हे सर्व करतांना पालकांनाही डोळे उघडे ठेवावे लागणार आहेत. हाणामारीचा विषय तर यापूर्वी ही कार्टून मालिकांमध्ये होताच पण त्याचबरोबरीने सुड, द्वेष, मत्सर या आणि इतर अनेक गोष्टी यातून मुलांसमोर मांडल्या जातात.
   आपण कार्टून चॅनल्सवर जे पाहतो तेच खरे असे मुलांना वाटत असते त्यामुळे त्या गोष्टी आत्मसात करायला त्यांना वेळ लागत नाही. आणि कुणावर तरी प्रयोग करुन पाहतात. कार्टून हे मुलांपर्यंत पोहचण्याचे एक प्रभावी माध्यम असुन त्याचा योग्य उपयोग व्हावा, शाळेत शिकविल्या जाणा-या विषयांशी संबंधित असावा जेणेकरून मुलांना तो विषय अधिक चांगल्या प्रकारे कळेल आणि अभ्यासातही गोडी निर्माण होईल,
शहरातील सामाजिक समस्यांवर कार्टून मालिकांमधून प्रकाश टाकला तर मुलांच्या मनात सजगता निर्माण होईल.पालकांनी मुलांसोबत कार्टून बघावे काय चांगले आणि काय वाईट हे त्यांना समजून सांगावे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

गणपती बाप्पा मोरया...

आमची बोली भाषा - अहिराणी

मोठे रॅकेट...

सहज सुचली म्हणून....

दंतकथा

मनातलं मन...

अभिनंदन केले पाहिजे

त्या आठवणी...

मायाजाल