मुंबई ठाणे परिसरातील शहरवासीय सुट्टीचा हंगाम किंवा निसर्ग भ्रमंती म्हणून अनेक वेळा आपण लोणावळा माथेरान माळशेज घाटात जातात. अशा हौशी मंडळींना शहरापासून थोड्या अंतरावर निसर्ग पर्यटन केंद्र उपलब्ध करून द्यावे या हेतूने टिटवाळ्याजवळील म्हस्कळ येथील पर्यटन केंद्र विकसित करण्यात येत आहे.
वनराईचे संरक्षण आणि संवर्धन व्हावे तसेच मुंबईसह परिसरातील पर्यटकांना शहराजवळच पर्यटनाचे एखादे केंद्र उभे रहावे यासाठी ठाणे वनविभागाने टिटवाळाजवळील म्हस्कळ येथील काळू नदीच्या किना-यावर सुमारे पन्नास एकर क्षेत्रात निसर्ग पर्यटन केंद्र उभारण्यास सुरुवात केली आहे. येत्या महिनाभरात हा प्रकल्प पूर्ण करुन तो खुला करण्यात येणार आहे.
कल्याण जनता सहकारी बँक आणि ठाणे भारत सहकारी बँक यांनी म्हस्कळ येथील वनविभागाची 50 एकर जमीन वृक्ष संवर्धन करण्यासाठी घेतली होती. 140 प्रकाराच्या 20 हजार रोपांची लागवड करुन ही सर्व झाडे जगवली. नक्षञ बाग मसाल्याची पदार्थांची लागवड रबराची झाडे अशा विविध लागवडी करुन ठाणे जिल्ह्यातील जमीन विविध प्रकारच्या लागवडींना योग्य आहे हे दाखवून दिले. विद्यार्थांना आमंत्रित करून त्यांच्याकडून रोपे लावून घेतली. वनराईत वनतळी बांधली, पक्ष्यांसाठी खांद्य व कृत्रिम घरटी तयार केली. त्यामुळे या परिसरातील पक्ष्यांची संख्या आणि अधिवास वाढला.
असा असेल प्रकल्प
बारमाही वाहणा-या काळू नदीच्या किना-यावर निवासासाठी राहुट्या बांधण्यात येतील. भोजनाची सुविधा असेल नदीकिनारी बाकडे बसवण्यात येतील. पक्षी वन्यजीव निसर्ग पाहण्यासाठी दोन उंच मनोरे उभारण्यात येतील. नदीत भ्रमंती करण्यासाठी बोटसेवा सुरू करण्यात येणार असून येथे फिशिंग पाॅइंटही उपलब्ध करून देण्यात येईल. वनराईत भ्रमंतीवाट करण्यासोबत नक्षञवनदेखील उभारण्यात येणार आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा