तुमचा पासवर्ड सुरक्षित आहे का

नेटसर्फिंग असो वा एखाद्या साईटवर माहिती फिलअप करणे असो, कोणतेही गाणे, गेम अथवा व्हिडिओ डाऊनलोड करताना फसव्या वेबसाईटवरून "फ्री‘ घेण्याच्या फंदात पडू नका. अधिकृत वेबसाईटवरूनच सॉफ्टवेअर, गाणी डाऊनलोड करा, तुम्ही टेक्‍नोसॅव्ही असालही; पण सायबर हॅकर्स तुमच्यापेक्षाही चतुर आहेत. तुमचा पासवर्ड, माहिती चोरण्याचे प्रयत्न ते करू शकतात. 
पारंपरिक गुन्ह्यांचे स्वरूप आता बदलत असून विनयभंग, फसवणूक व छेडछाडीचे प्रकार आता सोशल साईटसवर होऊ लागले आहेत. महिला, मुलींना जॉब ऑफर देण्यापासून ते त्यांची फसगत करेपर्यंत हे भामटे सक्रिय झाले आहेत. सायबर क्राईम करणाऱ्यांसाठी अख्खे जग खुले असल्याने या गुन्ह्यांची व्याप्ती वाढत आहे. सोशल वेबसाईटवर खाते उघडण्यापासून ते विविध वेबसाईटस्‌ सर्फिंग करून त्यात माहिती फिलअप करण्यापर्यंत आपण प्रवास करतो. अशावेळी या साईटस्‌ नियंत्रित करणारे आपली माहिती चोरण्याची शक्‍यता असते. फेसबुकचा पासवर्ड चोरून फोटो विद्रुप करून प्रसिद्धही केले जात आहेत. त्यावरील छायाचित्रांचा अश्‍लील वेबसाईटसाठी वापर केला जात आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा...

आमची बोली भाषा - अहिराणी

शुभ दिपावली

अभिनंदन केले पाहिजे

गणपती बाप्पा मोरया...

तूच तुझी वैरी

एक छोटासा प्रयत्न

त्या आठवणी...