थोडक्यात पण महत्वाचे...

हा विषाणू घरगुती जंतुनाशके आणि विरंजक पदार्थ (ब्लीच) वापरून, किंवा साबण व पाण्याने सतत हात धुण्याने मारला जाऊ शकतो, असे हाँगकाँग विद्यापीठातील संशोधकांनी म्हटले आहे. कोविड-१९ विषाणू स्टेनलेस स्टील व प्लास्टिकच्या पृष्ठभागांवर ४ दिवसांपर्यंत, तर फेस मास्कच्या बाहेरच्या स्तरावर एका आठवडय़ापर्यंत चिकटून राहू शकतो
हा विषाणू सामान्य तापमानात निरनिराळ्या पृष्ठभागांवर किती काळपर्यंत संसर्गक्षम राहू शकतो याची संशोधकांनी चाचणी केली. छापील कागद व टिश्यू पेपरवर तो ३ तासांपेक्षा कमी वेळ टिकला, तर प्रक्रिया केलेले लाकूड व कापडावरून तो दुसऱ्या दिवसापर्यंत नाहीसा झाला. काच आणि चलनी नोटा यांवर तो दुसऱ्या दिवशीही दिसत होता, मात्र चौथ्या दिवशी तो नाहीसा झाला. मात्र, स्टेनलेस स्टील व प्लास्टिक यांवर तो ४ ते ७ दिवसांपर्यंत जिवंत होता.
धक्कादायक बाब म्हणजे, वैद्यकीय उपयोगासाठी वापरल्या जाणाऱ्या फेस मास्कच्या बाहेरील स्तरावर हा विषाणू ७ दिवसांनंतरही संसर्गक्षम असल्याचे दिसले. त्यामुळेच, सर्जिकल मास्क वापरताना तुम्ही त्याच्या बाहेरच्या बाजूला स्पर्श न करणे अतिशय महत्त्वाचे आहे, असे या संशोधकांनी सांगितले.मी घरीच राहणार आणि कोरोनाला भारतातून घालवणार. आहारात पातळ पदार्थ म्हणजे डाळीचे पातळ पाणी, लिंबू सरबत, ताक, फळांचा रस, संत्री व द्राक्षाचा रस याला महत्त्व होते. तसेच जेवणात मोड आलेले कडधान्य, भाजीपाला, दही, दूध, तूप ,भात, भाकरी, चपाती याचा समावेश होता. त्याचबरोबर संत्री, द्राक्ष तसेच अन्य फळे देण्यात आली. या आहारामुळे रुग्णाची प्रतिकार क्षमता वाढण्यास मदतआहार, आराम, जीवनसत्त्व युक्त औषधे व समुपदेशन या त्रिसूत्रीमुळे अहवाल नकारात्मक येण्यास मदत झाली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा...

आमची बोली भाषा - अहिराणी

शुभ दिपावली

अभिनंदन केले पाहिजे

गणपती बाप्पा मोरया...

तूच तुझी वैरी

एक छोटासा प्रयत्न

त्या आठवणी...