दोन शब्दाची जादू...
कोरोनामुळे असलेल्या लॉकडाउन दरम्यान अशाप्रकारांचे प्रमाण वाढले आहे. अफवा व खोट्या बातम्या पेरुन भीती व द्वेष पसरविण्याच्या काही विघ्नसंतोषी लोक समाज माध्यमांचा दुरुपयोग करून सामाजिक व धार्मिक तेढ, दुही निर्माण करण्याचा, समाजात अराजकता माजवण्याचा प्रयत्न करीत आहेत.कृपया असे काहीतरी करू नका जेणेकरून तुम्ही अडचणीत याल काळजी घ्या. पोस्ट करतांना विचार करा.कोणतीही पोस्ट आली की फॉरवर्ड करू नका.पोस्ट आधी वाचा,विचार करा आणि मगच पोस्ट करा. फक्त दोन शब्दाची जादू आहे एक म्हणजे प्लीज आणि दुसरा शब्द म्हणजे थॅक्यू.
प्रसंग पहिला
एका वर्गात शिक्षकांनी विचारले: "प्रेमाचे जगातील सर्वश्रेष्ठ प्रतीक कोणते ?"
बहुतेक सर्व विद्यार्थ्यांनी एका सुरात उत्तर दिले: "ताजमहाल"फक्त एक विध्यार्थी म्हणाला "रामसेतू" !शिक्षकांनी विचारले: "कसे ?"
विध्यार्थी म्हणाला "रामसेतू प्रभू श्रीरामांनी आपल्या पत्नीला पुन्हा आणण्यासाठी बांधला आणि तो सेतू बांधायचे काम झाल्यावर त्यांनी स्वार्थीपणे बांधकाम करणाऱ्या वानरांचे हात नाही कापले तर, तर त्यां सर्वांना आपल्या बरोबर प्रेमाने अयोध्येला घेऊन गेले आणि आपल्या राज्यात मानाचे स्थान दिले" त्याच्या या उत्तराने शिक्षक आणि इतर विद्यार्थी सुन्न झाले आपण आपल्या इतिहास आणि पौराणिक वाङमयाकडे नव्या दृष्टीने पहायची गरज आहे ....! खरंच आता आपल्याला बदल घडविण्याची गरज आहे कारण बदल हा सृष्टीचा नियम आहे.अशा काही पोस्ट असतील तर फॉरवर्ड करा.
सध्या करोनाचा सामना सगळं जग करतं आहे. आरोग्य सेवा देणाऱ्या डॉक्टर, नर्सेस आणि इतर सगळ्या कर्मचाऱ्यांचं योगदान अनन्यसाधारण आहे. दिवस-रात्र एक करुन आपला जीव धोक्यात घालून डॉक्टर, नर्सेस आणि इतर आरोग्य कर्मचारी करोनाच्या संकट अधिक पसरू नये यासाठी काम करताना दिसत आहे. अनेक देशांमध्ये तर रुग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांना आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांना करोना झाल्याची उदाहरणेही आहेत. असं असतानाही डॉक्टर आणि नर्सेस त्यांचे कर्तव्य पार पडताना दिसत आहेत. डॉक्टर, नर्सेस आणि आरोग्य कर्चमाऱ्यांच्या याच निस्वार्थ वृत्तीला गुगलने डूडलच्या माध्यमातून अनोखा सलाम केला आहे. गुगलने याआधीही डूडलच्या माध्यमातून अनेकांना मानवंदना देऊन आभार प्रकट केले आहे. याबद्दल गुगलचे खूप खूप अभिनंदन गुगलबद्दल काय लिहावे जितके लिहावे तितके कमीच आहे मी सर्वप्रथम गुगलचे आभार मानतो त्यांच्यामुळे मला आज BLOG लिहिण्याची
सुर्वणसंधी मिळाली.किंवा थॅक्यू म्हणणारे संदेश पाठवा.
प्रसंग दुसरा
तिकडे तिचा पारा चढलेला ...तोंडाचा पट्टा सुरु ... आणि बोलता बोलता तिने फ्रीझ उघडला ...पिवळ्या प्रकाशातून बाहेर डोकावत ती तिथूनच ओरडली .. मटकी आहे ... मिसळ करू ... ? तो एव्हाना किचनच्या दारात आलेला ...डोळ्यात चमक ... चालेल ... पण तिखट कर हां...तिने फणकाऱ्याने मटकीचं भांडं बाहेर काढलं आणि जोरातच म्हणली... हो, मी शिरते आता त्यात तसा तो उत्स्फूर्तपणे म्हणाला ...
अगं .. गोड होईल मग ती...आता तिचा हात थांबला... तिने त्याच्याकडे पाहिलं...
मटकी गॅसवर चढेपर्यंत राग पूर्ण ओसरलेला...
आणि गालावर एव्हाना लाजेची खळी फुटलेली ...तात्पर्य काय ... संसारात योग्य वेळी योग्य शब्दांची फुंकर घालता यायला हवी... म्हणजे मग भांडण फार वेळ धगधगत रहात नाही ..अजून आपल्याला घरीच रहायचे आहे, तेंव्हा भांडु नका. प्लीज असे संदेश फॉरवर्ड करायला काहीच हरकत नाही.आणि थॅक्यू हे वाचन केल्याबद्दल.
टिप्पण्या