शो मस्ट गो ऑन...
मुंबई ही भारतातल्या महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. हे शहर महाराष्ट्राच्या पश्चिम किनाऱ्यावर वसले आहे. मुंबई हे भारतातील व दक्षिण, पश्चिम आणि मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या
उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. मुंबई शहराला नैसर्गिक बंदर लाभले असून या बंदरातून भारताची सागरी मार्गाने होणारी ५०% मालवाहतूक होते.भारताची आर्थिक व मनोरंजनाची राजधानी आहे. रिझर्व बॅंक, मुंबई शेअर बाजार, राष्ट्रीय शेअर बाजार या महत्त्वाच्या आर्थिक संस्था या शहरात आहेत. अनेक कम्पन्यांची मुख्य कार्यालये आहेत. येथे व्यवसाय व नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध असल्याने देशाच्या इतर भागातून मोठ्या प्रमाणात लोक येतात.
मुंबई हे बॉलीवूड व मराठी उद्योगाचे केन्द्र आहे. बोरीवली नॅशनल पार्क किंवा कृष्णगिरी राष्ट्रीय उद्यान म्हणून ओळखले जाणारे संजय गांधी राष्ट्रीय उद्यान हे मुंबईच्या हद्दीतच आहे.अशी ही आमची मुंबई आमच्या मुंबईला मायावि नगरी सुध्दा म्हटले जाते.असे म्हणतात मुंबईत कोणीही उपाशी झोपत नाही.
मुंबईसारख्या महानगरामध्ये, ठाणे, नवी मुंबई, पुणे अशा शहरांमध्ये परप्रांतीयांच्या वाढत्या संख्येवरून नेहमीच हवा तापवली जाते. पण आज या ठिकाणी दूध - पेपर टाकणारे, इस्त्री करणारे, भाज्या, फळांची विक्री करणारे, अँपवरून ऑर्डर दिल्यावर अन्न पदार्थ आणून देणारे, ऑनलाइन खरेदी केल्यावर त्या वस्तू घरपोच आणून देणारे, सिक्युरिटी गार्ड, घरकाम करणाऱ्या स्त्रिया, ओला - उबर गाड्या चालवणारे ड्रायव्हर, वेगवेगळ्या गोदामांमध्ये मालाची चढ उतार करणारे हमाल, बांधकाम मजूर अशी अनेक प्रकारची कामं करणारे परप्रांतीय जिवाच्या भीतीने आपापल्या गावी परतले आहेत.
लॉक डाऊन जेव्हा केव्हा संपेल तेव्हा ही सगळी माणसं लगेचच परततील का याविषयी आज तरी कुणीही काहीही सांगू शकत नाही. खरं म्हणजे जीवाच्या भीतीने शहरातून आपापल्या माणसांमध्ये निघून गेलेली ही मंडळी लगेचच परतण्याची शक्यता तशी कमीच आहे या मंडळींच्या नसण्यामुळे देखील शहरामधलं जनजीवन आज जरी ठप्प झाले असले तरी लॉकडाउन संपल्या नंतर जनजीवन पुन्हा मार्गी लागेल याबद्दल शंकाच नाही परप्रांतीय यांच्या जाण्याने सगळं ठप्प होईल हा समज असेल तर हा गैरसमज आधी दूर करा मुंबई ही आमची देखील आहे असे ठामपणे सांगणारे परप्रांतीय मुंबईवर कोरोनाचे संकट येताच आपल्या गावी जाण्यासाठी विनंती करू लागले आहे. मुख्यमंत्री यांनी तुम्ही खबरदारी घ्या मी तुमची जवाबदारी घेतो असे सांगूनही ते येथून पळ काढत आहे कोणी चालत कोणी दुधगाडीच्या साहाय्याने आपल्या गावी जाण्यासाठी प्रयत्न करत आहे.
मुंबईवर पहिल्यांदा काय संकट येत नाही याआधीही 26/11 आणि 26 जुलै ही संकटे आली होतीच पण यावर मुंबईने मात केली ज्या मुंबई स्थानकाचे नावच छत्रपती शिवाजी महाराज आहे. महाराजांनी औरंगजेबला सळो की पळो करून सोडले त्या ठिकाणी कोरोना विषाणू काहीच नाही या विषाणूवर आपण नक्कीच मात करू लंकापती रावणाचा सर्वनाश झाला प्रभु श्रीरामचंद्राच्या वनवासामुळे,महाराज कंस चा मृत्यू झाला श्रीकृष्णाच्या कारावासामुळे तसाच कोरोना विषाणू देखील नष्ट होईल तुमच्या गृहवासाने म्हणजेच तुमच्या घरीच राहण्यामुळे हे नेहमी लक्षात ठेवा.मुंबईमध्ये प्लेग,चिकन गुनीया आणि डेंगुची साथ आली पण मुंबई कधीच थांबली नाही जीवन चलनेका नाम चलते रहो सुबह शाम हे प्रसिद्ध अभिनेते मनोज कुमार यांच्या चित्रपटातील हे लोकप्रिय गाणे अजूनही आमच्या मुंबईला लक्षात आहे.कोणाच्या येण्याने आणि जाण्याने ही मुंबई कधीही थांबली नाही आणि कधीच थांबणार नाही आमची मुंबई आणि आम्ही फक्त एकच लक्षात ठेवतो की शो मस्ट गो ऑन.
टिप्पण्या