मराठी पाऊल पडते पुढे...

    टीव्हीला छोटा पडदा म्हणण्याचे दिवस आता गेले. आता हाच छोटा पडदा मोठा झाला आहे आणि बॉलिवूडलाही टक्करही देत आहे. टीव्ही कलाकार आता बॉलिवूडकरांपेक्षा जास्त मानधन घेत आहेत. मालिकांमध्ये काम करणाऱ्या कलाकारांची काम करण्याची पद्धतही वेगळी असते. अनेक शिफ्ट्समध्ये त्यांना काम करावं लागतं. मालिकेमधील एक व्यक्तिरेखा साकारण्यासाठी अनेक महिने, वर्षे लागतात. टीव्हीवरील असाच एक नावाजलेला चेहरा म्हणजे अभिनेते शिवाजी साटम.
      सोनी टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध कार्यक्रम 'सीआयडी'मध्ये अभिनेते शिवाजी साटम यांनी एसीपी प्रद्युम्न ही भूमिका साकारली. साटम सीआयडीच्या भागांसाठी महिन्यातून फक्त १५ दिवस काम करत. सीआयडीच्या टीमचे ते फार जुने सहकारी आहेत. साटम यांनी अभिनयाच्या जोरावर एसीपी प्रद्युम्न ही व्यक्तिरेखा अजरामर केली आहे.‘कुछ तो गडबड है’ हा संवाद ऐकला की आजही डोळ्यासमोर शिवाजी साटम यांचाच चेहरा येतो.पण तुम्हाला हे माहिती आहे का, की ही व्यक्तिरेखा साकारण्यासाठी शिवाजी साटम किती मानधन घ्यायचे? ‘जनसत्ता डॉट कॉम’ने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, शिवाजी साटम एका एपिसोडसाठी साधारणपणे १ लाख रुपये घ्यायचे. ते या कार्यक्रमासाठी महिन्यातले १५ दिवस काम करत तर उर्वरीत दिवसांत ते सिनेमांचे चित्रीकरण करत असत. शिवाजी साटम यांच्या करिअरची सुरूवात टेलिव्हिजनपासूनच झाली होती. यानंतर त्यांना अनेक सिनेमांच्या ऑफर्स येऊ लागल्या. आतापर्यंत त्यांनी अनेक हिंदी आणि मराठी सिनेमांमध्ये लक्षवेधी भूमिका साकारल्या आहेत. 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा...

आमची बोली भाषा - अहिराणी

शुभ दिपावली

अभिनंदन केले पाहिजे

गणपती बाप्पा मोरया...

तूच तुझी वैरी

एक छोटासा प्रयत्न

त्या आठवणी...