एक छोटासा प्रयत्न...
राजकारण हा विषय मलाच काय? कोणालाही न समजणारा विषय आहे तरी या विषयावर नेहमी शांत बसणारे माणसे देखील भरभरून बोलायला लागतात किती प्रेम किती जिव्हाळा असतो त्यांचा या विषयावर राजकारण इतिहासात देखील होते त्यांचे ज्वलंत उदाहरणे म्हणजे रामायण आणि महाभारत.शहाणे लोकांनी कोर्टाची पायरी चढू नयेत असे म्हणतात तसेच राजकारणावर बोलू काही त्यापेक्षा शांतपणे बसणे केव्हाही योग्यच म्हणावे लागेल.
न्यूज चॅनलवाले मात्र आपले काम व्यवस्थित करत आहेत याबद्दल त्यांचे कौतुक करावे तेवढे कमीच आहेत.श्रीमंत लोकांनाकडून लॉक डाऊन काळात कोणाकडून किती देणगी मिळाली किंवा लॉकडाऊन असताना श्रीमंत लोक घरात काय करतात? तसेच गरीब लोक कसे जगतात त्यांना कोणत्या समस्यांना तोंड द्यावे लागते आणि सरकार त्यांना कोणत्या पद्धतीने मदत करते याबद्दल न्यूज चॅनलवाले जीव मुठीत धरून पुढाकार घेतांना दिसत असले तरी मध्यमवर्गी लोकांचे काय? त्यांच्याकडे तर सरकारचे दुर्लक्षच आहे.निदान न्यूज चॅनलवाल्यांनी तरी लक्ष ठेवणे गरजेचे आहे.
लॉकडाऊन मुळे आरोग्य,उदयोगधंदे,नोकरी आणि आपली अर्थव्यवस्था धोक्यात आली आहे. लॉकडाऊन मुळे एक गोष्ट चांगली झाली ती या कालावधीत ध्वनी,जल आणि वायू प्रदूषणात घट झाली आहे त्याचाच परिणाम म्हणजे जंगलात राहणारे पक्षी,प्राणी आपल्या मानवी वस्तीत दिसून येत आहे.कधीही न दिसणारे समुद्री जीव आणि मासे समुद्रात आणि खाडीत दिसू लागले आहेत. असे म्हणतात 'कुछ पाने के लिए कुछ खोना पडता है' बरोबरच आहे.
टिप्पण्या