जुगलबंदी

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये महान फलंदाज, क्रिकेटचा देव म्हणजेच सचिन आणि महान गोलंदाज, फिरकीचा बादशहा शेन वॉर्न यांच्यातलं द्वंद्व,जुगलबंदी प्रत्येकाला माहिती आहे. बहुतांश वेळा सचिनने शेन वॉर्नची धुलाई केलेली आहे. शेन वॉर्नबद्दल सचिनच्या अनेक खेळी गाजलेल्या आहेत. "सचिन कधीकधी पुढे येऊन वॉर्नला आखूड टप्प्याचा चेंडू टाकण्यासाठी भाग पाडायचा. कधीकधी बॅकफूटला जाऊन तो सुरेख फटके खेळायचा. एका प्रकारे हे शेन वॉर्नला आपल्या इशाऱ्यावर नाचवण्यासारखं होतं. शेन वॉर्नच्या गोलंदाजीवर फार कमी फलंदाज मोठे फटके खेळू शकायचे, सचिन त्यापैकी एक होता. सचिनला बाद करण्यासाठी शेन वॉर्न आपल्या शैलीत अनेक बदल करायचा पण यामध्ये त्याला फारसं यश लाभलं नाही." सचिन आणि शेन वॉर्न कसोटी सामन्यात १२ वेळा समोरासमोर आले, यापैकी ३ वेळा सचिन शेन वॉर्नच्या गोलंदाजीवर बाद झाला.
तसेच राजकारणी लोक आणि सर्वसामान्य माणसे जेव्हा आमने सामने तेव्हा काय धमाल उडते वाचा.राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी रविवारी सायंकाळी पाच वाजता आपल्या 
फेसबुकवरुन ‘आपुलकीचा संवाद’ या नावाने जनतेशी संवाद साधला. पाच वाजता त्यांच्या पेजवरुन फेसबुक लाइव्ह सुरु झाले आणि कमेंटमध्ये इमोन्जी, स्मायली आणि कमेंटचा पाऊस पडू लागला. मुनगंटीवार काय बोलत आहेत याऐवजी ट्रोलर्सने आणि टीकाकारांनी त्यांच्या फेसबुक लाइव्हदरम्यान कमेंट करत त्यांना वेगवेगळ्या विषयांवर जाब विचारण्यास सुरुवात केली. मुख्यमंत्री मदतनिधीऐवजी पीएम केअर्ससाठी मदत करण्यास का सांगितले जात आहे?, हा प्रश्न अनेकांनी विचारला. तसेच अनेकांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची बाजू घेत मुनगंटीवार यांना थेट लाइव्हदरम्यान कमेंटमधून प्रश्न विचारले. अनेकांनी खास ग्रामीण भाषेमध्ये मुनगंटीवार आणि भाजपाच्या भूमिकेवर टीका केली. एकीकडे ट्रोलर्स आणि टीकाकर कमेंटच्या माध्यमातून टीका करत असतानाच दुसरीकडे मुनगंटीवार यांनी आपला संवाद सुरुच ठेवला होता. मात्र टीका करणाऱ्या आणि केवळ स्मायली असणाऱ्या कमेंट दीड हजारांहून अधिक झाल्या. त्यानंतर मात्र मुनगंटीवार यांनी संवाद थांबवण्याचा निर्णय घेतला. थोड्या वेळाने मुनगंटीवार यांच्या फेसबुक पेजवरील लाइव्हचा हा रेकॉर्डेड व्हिडिओही डिलीट करण्यात आला.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा...

आमची बोली भाषा - अहिराणी

शुभ दिपावली

अभिनंदन केले पाहिजे

गणपती बाप्पा मोरया...

तूच तुझी वैरी

एक छोटासा प्रयत्न

त्या आठवणी...