फास्टफूड की सुपरफूड्स ...

     'सुपरफूड्स' हा शब्द ऐकल्यावर कदाचित वाटेल की हे अन्नपदार्थ आपल्याला सहजपणे उपलब्ध होतील का? आपल्याला परवडतील का? आपल्या जवळपासच्या दुकानामध्ये हे मिळतील का? पण अशी कोणतीही शंका तुमच्या मनात असेल तर ती तुम्ही लगेच काढून टाका काजू बदाम,अक्रोड म्हणजे सुपरफूड्स नव्हे असे अन्नपदार्थ जे आपण पिढयानपिढया खात आलो आहोत.आपल्याच परिसरात सहजपणे पिकणारे, वाढणारे धान्य,कडधान्य,फळे,भाज्या म्हणजेच सुपरफूड्स.
    वजन वाढविण्यासाठी आहारामध्ये कायम प्रोटीनयुक्त पदार्थांचा समावेश करायला हवा. दूध आणि दुग्धजन्य पदार्थांमधून शरीराला मोठ्या प्रमाणात प्रोटीन मिळत असतात. त्यामुळे दूध, पनीर या पदार्थांचा आहार समावेश करायला हवा. त्यासोबतच शेंगा आणि डाळींचाही आहार समावेश करावा.ज्या पदार्थांमधून शरीराला कार्बोहायड्रेट मिळतात त्या पदार्थांचं जास्तीत जास्त सेवन करावं. गहू, ब्राऊन राईस, धान्य यामधून शरीराला मोठ्या प्रमाणावर कार्बोहायड्रेट्स मिळत असतात. त्यासोबतच ताजी फळं, बटाटे, सुकामेवा आणि आंबा यांच्यामुळेदेखील कार्बोहायड्रेट्स वाढण्यास मदत होते.ज्या पदार्थांमध्ये स्निग्ध पदार्थांचा अंश जास्त असतो अशा पदार्थांचा जेवणामध्ये हमखास वापर करावा. त्यामुळे वजन वाढण्यास मदत होते. सूर्यफुलाचं तेल,मासे या पदार्थांमध्ये स्निग्धांश जास्त प्रमाणात असतात.त्यामुळे वजन लवकर वाढतं.चिकन, फळ, भाज्यान शेंगदाणे आणि पनीर या पदार्थांचा आपल्या आहारात नक्कीच समावेश व्हायला हवा. या पदार्थांचं सेवन केल्यामुळे वजन लवकर वाढतं. त्यामुळे रोजच्या आहारात संपूर्ण धान्य,पास्ता यांचा समावेश करावा.
        फास्टफूड, जंक फूड खाण्यापेक्षा सकस आहारावर लक्ष केंद्रीत केलं पाहिजे. नाश्तामध्ये एक ग्लास दूध, सफरचंद आणि मुठभर शेंगदाणे यांचा समावेश करावा.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

गणपती बाप्पा मोरया...

सहज सुचली म्हणून....

त्या आठवणी...

अभिनंदन केले पाहिजे

आमची बोली भाषा - अहिराणी

मोठे रॅकेट...

दंतकथा

एक छोटासा प्रयत्न

विंचू