मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा...

आई’ या दोन अक्षरी या शब्दाचा महिमा सारं विश्व व्यापून आहे. आईचे प्रेम, ममता, वात्सल्य, पाठिंबा, बळ यासाठी एक दिवस पुरेसा नाही. पण आईप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी एक दिवस साजरा केला जातो. तो म्हणजे मातृदिन.आज, १० मे रोजी भारतासह जगभरात 'मातृदिन' उत्साहात साजरा केला जात आहे. आईवरचं प्रेम साजरं करण्याचा हा दिवस. खरंतर आईवरील प्रेम दाखवण्यासाठी किंवा व्यक्त करण्यासाठी एक दिवस पुरेसा आहे का? किंवा एकच दिवस का? तिचे महत्त्व, महती व्यक्त करण्यासाठी शब्द अपुरे पडतात. पण अनेक थोरामोठ्यांनी आपल्या लेखणीतून आईची थोरवी शब्दात मांडली आहे. मातृदिना निमित्त पाहुया आईबद्दलचे थोरामोठ्यांचे विचार...

आई म्हणजे तव्यावरची गरम गरम पोळी
औषधावर दिलेली लिमलेटची गोळी
आई म्हणजे प्रसादाचा खडीसाखर खडा
शाळेआधी पाटीवर लिहून दिलेला धडा
आई म्हणजे पाठीवरून फिरवलेला हात
मेतकूट कालवलेला मऊ तूपभात
आई म्हणजे देव्हाऱ्यातले लक्ष्मीचे चित्र
सगळ्या मित्रांमधला माझा आवडता मित्र
आई एक नाव असतं
घरातल्या घरात गजबजलेलं गाव असतं!
सर्वांत असते तेव्हा जाणवत नाही
आता नसली कुठंच तरीही नाही म्हणवत नाही

  • ठेच कान्हूला लागली
  • यशोदेच्या डोळा पाणी
  • राम ठुमकत चाले
  • कौसल्येच्या गळा पाणी,
  • देव झाला तान्हुला ग
  • कुशीत तू घ्याया,
  • तिथे आहेस तू आई  
  • जिथे आहे माया!!’

  • ‘चारा मुखी पिलांच्या चिमणी हळूच देई
  • गोठय़ात वासरांना या चाटतात गाई,
  • वात्सल्य हे पशूंचे मी रोज रोज पाही
  • पाहून अंतरात्मा व्याकूळ मात्र होई,
  • नोहेचि हाक माते मारी कुणी कुठारी
  • स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी!’

आईला सन्मान देणारया मातृत्वदिनाची पहिली सुरुवात झाली ती अमेरिका देशात. अॅक्टिविस्ट अॅना जार्विस आपल्या आईवर खूप प्रेम करायची. तिने ना लग्न केले ना मुले जन्माला घातली. आईचा मृत्यू झाल्यावर तिने या दिवसाची सुरुवात केली. मग हळू हळू अनेक देशांमध्ये हा दिवस साजरा करायला सुरुवात केली.

मेच्या दुसऱ्या रविवारी का साजरा करतात मातृदिन ?

९ मे १९१४ रोजी अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष वुड्रो विल्सन यांनी एक कायदा पास केला. ज्यामध्ये लिहिले होते की, मेच्या दुसऱ्या रविवारी मदर्ड डे साजरा केला जाईल. त्यानंतर मातृदिनअमेरिकासह इतर देशांमध्ये याचदिवशी साजरा केला जाऊ लागला.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आमची बोली भाषा - अहिराणी

शुभ दिपावली

अभिनंदन केले पाहिजे

गणपती बाप्पा मोरया...

तूच तुझी वैरी

एक छोटासा प्रयत्न

त्या आठवणी...