अल्बम


तणावमुक्त जगण्यासाठी रोज किमान दोन तास स्मार्टफोन, संगणक, दूरचित्रवाणी यांसारख्या पडद्यांपासून लांब राहा; थोडक्यात कायतर  ‘डिजिटल पथ्या’चे पालन करा. त्याऐवजी वाचन, छंद, संगीत,लेखन यांपैकी एखाद्या गोष्टीत मन गुंतवा तेवढाच बदल असे म्हणतात बदल हा सृष्टीचा,निसर्गाचा नियम आहे. व. पु. काळे यांनी देखील म्हटले आहे आपल्या वयाला हरवायचे असेल तर आपल्यातील छंद जिवंत ठेवायला पाहिजे.असाच माझा एक छंद म्हणजे पुस्तक वाचन जुनी पुस्तक चाळता चाळता मला लोकसत्ता वृत्तपत्राने प्रकाशीत केलेले "लोकसत्ता अर्थब्रह्म" दिसले. पुर्वी डिग्रीला असताना वाचलेली. पण अनुभव सारखे नव्हते. पहिल्यावेळी वाचतानाचा अनुभव आणि यावेळी वाचतानाचा अनुभव काही वेगळाच होता. पहिल्या वेळी वाचताना आपण कुठलं रटाळ पुस्तक वाचतोय असं वाटतं होतं... तेंव्हा येवढी समज नव्हती किंबहूना आयुष्यातली पहिले पुस्तक असल्यामुळं असेलही कदाचित म्हणजे पुस्तक तेचं पण अनुभव मात्र वेगळा.

मुखपृष्ठावरील चित्रे पाहूनच मी पुस्तक विकत घेतले होते.त्यांचा याआधीही 'लोकप्रभा' हा विशेषांक प्रसिद्ध झालेला आहे.आणि त्यास वाचक प्रतिसादही खूप मिळाला आहे.'लोकसत्ता अर्थब्रह्म' या विशेषांका मध्ये एकूण 22 लेख आहेत आणि यामधील बहुतांशी लेख शेअर मार्केट,गुंतवणूक वर आधारित आहेत यात आयुर्विमा,एसआयपी आणि विमाकवच, ईच्छापत्र,सेवानिवृत्ती कधी व केव्हा घ्यायची यांचे  सुरेख वर्णन करण्यात आलं आहे.गुंतवणूक दाराची अवस्था सध्या चक्रव्यूहातील अभिमन्यूप्रमाणे झाली आहे.आज जगा, मजा करा,उद्या कोणी बघितलंय आणि म्हणून बिनधास्त खर्च अशांना मखमली चिमटे घेऊन बचतीचे महत्व पटवून देणारा हा अंक असणार आहे. 'माणसाला एक मासा दिला तर आपण त्याची एक दिवसाची भूक भागवू शकतो,पण त्याला मासा पकडायला शिकवला तर त्याची आयुष्यभराची भुकेची तरतूद करू शकतो' चागल्या संकल्पनांचा लक्षवेधक वापर लेखकांनी केला आहे. गुंतवणूकीची रक्कम ही खर्चानंतर उरलेली रक्कम नसावी तुमच्या खर्चाची रक्कम गुंतवणूकीनंतर उरलेली रक्कम असावी.अवघड वाटणार् या गोष्टीचा अर्थ अतिशय सोप्या भाषेत आणि छोटी छोटी उदाहरणं देऊन समजावून सांगितला आहे.शेअर बाजार फक्त ह्रतिक वर आहे HRITIK म्हणजे  H - Hdfc/Hul  
R - Reliance I - Itc T - Tcs  I - Infosys 
K - Kotak. कशाची उपमा देऊन सांगितलं तर चांगल्या रितीने समजतं आणि आवडतं याच कल्पनेचा वापर यात उत्तमरित्या केला आहे. "मोठे पैसे कमवायला आणि गोमटी फळे चाखायला सातत्याने केलेली छोटी गुंतवणूक ही खूप महत्वाची ठरते " संपादक श्री गिरीश कुबेर यांनी लिहिलेले संपादकीयमध्ये 'नवा संकल्प' आणि 'नवा अर्थ' खुप छान मांडले आहे त्यात संकल्प अधिक आणि अर्थ देखील मुबलक आहे ते शोधून वाचकांपर्यंत नेण्याचा प्रामाणिक प्रयत्न तसेच गुंतवणूकीची बेरीज न होता गुणाकार कसा होईल हे विशद करणारा हा विशेषांक असणार आहे. मुखपृष्ठ सुशांत ऐनापुरे यांनी छान बनवले असून अंतरंगमध्ये काय असणार हे दर्शविण्यात आले आहे त्यात बचत,शिक्षण, गोल्ड,गुंतवणूक, करन्सि तसेच प्रॉपर्टी दाखवण्यात आले असून हे पुस्तक जसे जसे वाचाल तसे तसे तुम्ही गुंतवणूकीची एक एक सीडी चढाल अगदी पहिल्या पगार पासून ते सेवानिवृत्ती योजनेसाठी शिस्तबद्ध आणि नियमितपणे गुंतवणूक कशी व केव्हा करावी याबाबत खूप चांगली उपयुक्त माहिती यात देण्यात आली आहे.

1)अजय वाळिंब (लेखक - भांडवली बाजार विश्लेषक)
2)डॉक्टर मेघा शेट्ये (लेखिका - कायदा जाणणारी)
3)नीलेश तावडे (लेखक - 20 वर्ष म्युच्युअल फंड क्षेत्रात कार्यरत)
4)कौस्तुभ जोशी (लेखक - अर्थशास्त्राचे प्राध्यापक)
5)तृप्ती राणे (लेखिका - सेबी नोंदणीकृत गुंतवणूक सल्लागार आहेत)
अशी अनुभवी लेखकांची फौज आहे.

1)पूर्वग्रह समजूत आणि गुंतवणूकीचे वर्तन
2)आयुर्विमा असायलाच हवा!
3)उद्दिष्टानुसार गुंतवणूक आणि तुमची दिशा
4)पोर्टफोलियोची स्वच्छता आणि पुनर्बांधणी
5)बाय-बॅक लाभ आणि तोटे आणि एसआयपी
असे हे दर्जेदार लेख वाचण्यासारखे आहेत.

पुस्तकाचे नाव - लोकसत्ता अर्थब्रह्म
संपादक - गिरीश कुबेर
मुखपृष्ठ - सुशांत ऐनापुरे
मांडणी/सजावट - संदेश पाटील
किंमत - 60/-



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा...

आमची बोली भाषा - अहिराणी

शुभ दिपावली

अभिनंदन केले पाहिजे

गणपती बाप्पा मोरया...

तूच तुझी वैरी

एक छोटासा प्रयत्न

त्या आठवणी...