पछाडलेला...
मनुष्य हा अत्यंत बुद्धिमान, ढोंगी आणि मजेशीर प्राणी आहे. आनंदाच्या क्षणांसाठी किंवा दुःख विसरण्यासाठी म्हणा हवं तर, त्याने दारुचा शोध लावला म्हणून तो बुद्धिमान आहे.आता मद्यपी नशा करतात असा आरोप आहे. पण पछाडलेल कोण नसतं? कुणाला पैशाची पछाडलेल असते, कुणाला गरिबीनी! कुणाला सत्तेने पछाडलेल असते तर कुणाला विरोधाने! किंबहुना ज्यांना कोणत्याही गोष्टीने पछाडलेल नाही, त्यांचं जीवन व्यर्थच! काळ बदलला, नी नशेत असताना काही चांगला विचार होऊ शकतो ही शक्यताच बहिष्कृत झाली. इतकी की, मद्याला स्पर्श देखील न करणाऱ्या माणसानं काही उलट सुलट वक्तव्य केलं तर त्याला काय दारू पिऊन आलाय का असं हेटाळलं जातं.संचारबंदीच्या काळातच ‘होममेड अल्कोहोल’ म्हणजे घरातल्या घरात दारु कशी बनवता येईल हे ऑनलाइन सर्च करणा-यांचं प्रमाण वाढलं. बाजारात दारु उपलब्ध नाही म्हणून ती घरी कशी बनवता येईल, दारु बनवण्याची ‘रेसिपी’ कुठे मिळेल, याचा विचाराने "पछाडलेला" हा बुद्धिमान प्राणी करु लागला. आहे की नाही गंमत! गुगल ट्रेंड्सनुसार, २२ मार्च ते २८ मार्च या आठवड्यात “घरी अल्कोहोल कसं बनवावं” (how to make alcohol at ho...