आमची बोली भाषा - अहिराणी

भाषा म्हणजे नेमकं काय, असा प्रश्न तुम्हाला कधी पडलाय? प्राणी आणि मानव, समूह करून राहतात. त्यामध्ये परस्परांशी संपर्क साधायला, एखादी गोष्ट समोरच्यापर्यंत पोहोचवायला जे माध्यम वापरलं जातं, ते माध्यम म्हणजे भाषा. त्यात अगदी हावभाव, कृती, ध्वनी या सर्वांचा समावेश होतो. भाषेचा नेमका उगम मात्र कसा झाला हे अजून पूर्णपणे स्पष्ट झालेलं नाही. आमची बोली भाषा - अहिराणी...

अहिराणी भाषा ही खान्देश विभागणी बोलीभाषा शे. ही भाषा लाखो खान्देशी मानसेनि आवडनि भाषा शे.जवळपास ९५% टक्का खान्देशना लोके अहिराणी बोलतस तेसनी बोलीभाषा शे. जळगाव , धुळे, नंदुरबार, औरंगाबाद तथा नाशिका जिल्हांना काही भाग्मा अहिराणी भाषा बोलतस पारोळा, एरंडोल ,सटाणा,मालेगाव ह्या तालुकास्मा सर्व जाती जामातीसनी मायबोली भाषा शे.जळगाव,नंदुरबार,धुळे त्या नासिक बागलाण, मालेगाव तयां कळवण तालुका जिल्हांना काही विशिष्ट तालुकामा अहिराणी हीच बोलीभाषा शे .ह्यामाभी पोटभाषा शे ज्याम थोडाथोडा बदल जानवस ,जसा चाळीसगाव, मालेगाव व धुळामा वेगवेगळ्या तोनामा हि बोलीजास. अहिराणी हि भाषा हिंदी, मराठी, गुजराथी ह्या भाशासन तोडीमोसन बनेल शे . परंतु अहिराणी भाषणं जो शब्दाभारना से तो ईतर दुसऱ्या कुठलाबी भाषामा नही म्हणून हीन एक वेगळेपणा शे. अहिराणी हि भाषा देवानागारीमा लीरवी जास. " बहिणाबाई" हि अहिराणी भाषा मा काव्य करणारी एक संत कवयित्री शे .. बहिनाबाईना कविता संग्रह विविध शाळा, महाविद्यालयमा पाठ्यक्रम मा समाविष्ठ करेल शे. परंतु ह्या कवयात्रिणी कविता अहिराणी नही असा समजूत शे, ती बिलकुल खोटी शे कारण अहिराणी तथा लेवापातीलासनी भाषा हि खानदेश विभागणी पोट भाषा शे, म्हणून " खानदेशी भाषा" म्हनीसन सर्व वाद विवाद खातं झाया व ह्या विभागणी हि मातृभाषा म्हनिसन महत्व प्राप्त शे. 


ना काम ना धंदा,
चित लागस नही कसामा यंदा,
घरना लोक जेवतस तिनदा,
भांडा धवो चारदा,
कथायी ऊना माय हाऊ*
कोरोना गंदा..

लोकसले गाव फिराना
व्हयनात वांदा...
बंद पडी गयात कामे धंदा,
कोनी देवाले तयार नही 
रुपया बंदा,
कथाई ऊना माय हाऊ
कोरोना गंदा...

लगीनना बँड वाजना
नही यंदा,
पंगतमा जेवणारस्ना व्हयी
रायनात वांदा,
घरमाच खाई रायना
खिचडी संग कांदा,
कथाई ऊना माय हाऊ
कोरोना गंदा...

म्हणे लाकडाऊन आखो 
वाढाव शे,
सरकार नवीन कायदा 
काढाव शे,
यंदा घरमाच जिवन
जावाव शे,
सापडत नही या
रोगना पंदा,
कथाई ऊना माय हाऊ*
कोरोना गंदा...

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा...

शुभ दिपावली

अभिनंदन केले पाहिजे

गणपती बाप्पा मोरया...

तूच तुझी वैरी

एक छोटासा प्रयत्न

त्या आठवणी...