गणपती बाप्पा मोरया लवकरच घरी आणुया घरीच सूरक्षित राहूया त्याचे स्वागत करूया कोरोना कसा पळतो ते पाहूया डोळ्यात आपल्या साठवूया आणि मग बाहेर पडूया जशी व्यवसायात प्रगती करूया तशीच नोकरीत प्रमोशन घेऊया सुखाने,समाधानाने जगूया... एवढेच बोलून संपवूया चला आत 2021 कसे असेल ते पाहूया. - विनायक पवार
भाषा म्हणजे नेमकं काय, असा प्रश्न तुम्हाला कधी पडलाय? प्राणी आणि मानव, समूह करून राहतात. त्यामध्ये परस्परांशी संपर्क साधायला, एखादी गोष्ट समोरच्यापर्यंत पोहोचवायला जे माध्यम वापरलं जातं, ते माध्यम म्हणजे भाषा. त्यात अगदी हावभाव, कृती, ध्वनी या सर्वांचा समावेश होतो. भाषेचा नेमका उगम मात्र कसा झाला हे अजून पूर्णपणे स्पष्ट झालेलं नाही. आमची बोली भाषा - अहिराणी... अहिराणी भाषा ही खान्देश विभागणी बोलीभाषा शे. ही भाषा लाखो खान्देशी मानसेनि आवडनि भाषा शे.जवळपास ९५% टक्का खान्देशना लोके अहिराणी बोलतस तेसनी बोलीभाषा शे. जळगाव , धुळे, नंदुरबार, औरंगाबाद तथा नाशिका जिल्हांना काही भाग्मा अहिराणी भाषा बोलतस पारोळा, एरंडोल ,सटाणा,मालेगाव ह्या तालुकास्मा सर्व जाती जामातीसनी मायबोली भाषा शे.जळगाव,नंदुरबार,धुळे त्या नासिक बागलाण, मालेगाव तयां कळवण तालुका जिल्हांना काही विशिष्ट तालुकामा अहिराणी हीच बोलीभाषा शे .ह्यामाभी पोटभाषा शे ज्याम थोडाथोडा बदल जानवस ,जसा चाळीसगाव, मालेगाव व धुळामा वेगवेगळ्या तोनामा हि बोलीजास. अहिराणी हि भाषा हिंदी, मराठी, गुजराथी ह्या भाशासन तोडीमोसन बनेल शे . परंतु अहिराणी भाषणं
कोरोना - जगातील सर्वात मोठे मेडिकल रॅकेट. जर तुम्हाला कोरोना झाला नसेल तर हा मेसेज वाचल्यावर पुन्हा कधीही आयुष्यात कोरोना होणार नाही. जर तुम्हाला कोरोना झाला असेल तर हा मेसेज वाचून तुमचा कोरोना कायमचा बरा होणार. या मेसेजमुळे अखिल मानव जातीचे कल्याण होणार आहे.सगळा भारत कोरोनामुक्त होणार आहे आणि तेही एकही रुपया खर्च न करता. तीन महिन्यापेक्षा जास्त काळ झाला आहे.जगातील कुठल्याच देशाला आजपर्यंत कोरोनावर लस किंवा औषध शोधता आले नाही ही सत्य परिस्थिती आहे. व्यक्तीचे नाव. डॉ-बिस्वरूप राय चौधरी. यांचे काय म्हणणे आहे. 1.टेस्ट किट. तुम्हाला थोडक्या शब्दात सांगायचे झाले तर कोरोना नावाच्या राक्षसाला गेली तीन महिने तुम्ही तुमच्या सर्व अस्त्र,शस्त्र, तंत्र,मंत्र सर्व आर्थिक ताकद लावून लढत आहात पण तो मरत नाही. त्याचे कारण त्या राक्षसाचा जीव त्या कोरोना टेस्ट किट मध्ये आहे. तुम्ही टेस्टच करू नका तुम्हाला कधीच कोरोना होणार नाही. तुम्ही स्वतःला निरोगी समजत असाल तरी तुमची टेस्ट पोजिटिव्ह येऊ शकते. कारण या टेस्ट किट सदोष आहेत. 2. मास्क. मास्क वापरणे हे आरोग्यास सर्वांत अहितकारक आहे. उलट तुम
तुझ्याच हाती सर्व काही. माझ्या हातात काहीच नाही. तुझ्या हाती माझा आणि आईवडीलांचा जीव माझ्याच बँकेत तुझी फीक्स आणि ठेव तूच माझी होम मीनीस्टर तूच माझी फायनांस मीनीस्टर तूच मूलाबाळांसाठी प्रेमाची माऊली जशी उन्हाळ्यात हवीहवीशी वाटणारी सावली तू वजा होता मी शून्य शून्य तू बेरीज होता मी धन्य धन्य माझ्याकडून छोटासा हा एक प्रयत्न पूर्ण होतील आपले इच्छा आणि स्वप्न चलातर मग लॉकडाऊन मध्ये घेऊन यळकोट जय मल्हार जेजूरीचे दर्शन.... विनायक पवार
प्रत्युषा बनर्जी एक चांगली अभिनेत्री होती. कलर्स वर प्रसारित होणारी मालिका बालिका वधु मध्ये आनंदीची भूमिका करत होती. तसेच रियलिटी शो झलक दिखला मधे सीजन 5 आणि बिग बॉस सीजन 7 मधे ती सहभागी झाली होती. तीचा मृत्यु 1 अप्रैल 2016 रोजी तीच्या राहत्या घरी अंधेरीत झाला. प्रत्युषा बॅनर्जी आणि जिया खानच्या जाण्याने अवघे बाॅलिवूड हादरले. मात्र असा अकाली आणि अनपेक्षितपणे स्वतः च्या जीवनाचा अंत करणारी ती एकटीच नव्हती. नैराश्य, खाजगी आणि व्यावसायिक आयुष्यातील अपयश, एकटेपणा यांमुळे जीवनाला कंटाळलेले अनेक कलाकार बाॅलिवूडने पाहिले. यापैकी काहीच्या मृत्यूबद्दल आजही दंतकथा ऐकायला मिळतात.यात अंत्यत मनस्वी अशा गुरूदत्तपासून दाक्षिणात्य चित्रपटांमधील 'चटकचांदणी' म्हणून ओळखल्या जाणा-या सिल्क स्मितापर्यंत अनेक कलाकारांचा समावेश आहे .... निराशेच्या गर्तेत निखळलेले तारे... गुरूदत्त : चित्रपटसृष्टीला धक्का देणारा मृत्यू म्हणजे अत्यंत मनस्वी आणि कलंदर अशा गुरूदत्त यांचे निधन ! यशाच्या शिखरावर असताना अतिशय कमी वयात त्यांचा मृत्यू झाला. दारू आणि झोपेच्या गोळ्या यांचे अतिरिक्त सेवन केल
खूप दिवसांनी ब्लॉग लिहायचा विचार चालू होता.पण फस्ट,सेंकड आणि नाईट शिप्ट असल्या कारणाने काही जमत नव्हते तसेच या तिन्ही वेळा संभाळून आपल्या व्यवसायात पण खारीचा वाटा उचलणे हेही तितकेच माझ्यासाठी खूपच महत्वाचे होते.पगार आज आला की दोन दिवसात कधी संपतो हे फक्त नोकरी करणाऱ्यांना माहीत असते.म्हणूनच वडिलांपासून मिळालेला व्यवसाय चालू असल्याने मला काही पैशांची चणचण कधीच भासली नाही.वडील नेहमीच म्हणायचे मी असो किंवा नसो या व्यवसायाकडे कधीच दुर्लक्ष करू नकोस शेवटी व्यवसाय तुला प्रत्येक अडचणीतून बाहेर काढायला नक्कीच मदत करेल.शेवटी त्यांचे बोल खरे ठरले आणि आज प्रत्यक्षात ते मी आज अनुभवतो आहे.काय त्यांची दुरदृष्टी होती मानले पाहिजे त्यांना त्यावेळी सगळे हसण्यावारी आमच्याकडून घेतले जायचे ती आमचीच मोठी चूक होती... आज त्या गोष्टी आठवल्या की आम्हांला आमचीच लाज वाटते.ते सतत दरवर्षी मला एक डायरी नवीन वर्षानिमीत्त भेटवस्तु म्हणून देत... प्रत्येक दिवसाचा हिशेब,आज दिवस भरात आपण काय शिकलो काय नाही याची नोंद करायला लावत जेणेकरून महिन्याच्या शेवटी चर्चा करून भविष्यात ते आपण कधीच विसरून जाऊ नये हा त्यांचा अट्टा
प्रशासकीय अधिका-याने ठरविले तर तो काहीही करू शकतो, हे गेले दीड वर्ष ठाणे जिल्हाधिकारीपदाचा कार्यभार सांभाळणा-या डॉक्टर अश्विनी जोशी यांनी अत्यंत चांगले प्रकारे दाखवून दिले त्याबद्दल त्याचे खूप खूप आभार. पूर्वीच्या काळी गुंडांकडून शासकीय अधिका-यांना त्रास होत होता पण आता हे चित्र उलटे पहावयास मिळते ज्या लोकांनी प्रतिनिधी म्हणून निवडून दिले आहे त्यांच्याकडून आता त्रास व्हायला लागला आहे असे नेतृत्व काय कामाचे.डॉ. अश्विनी जोशी यांनी कणखर कल्पक आणि कार्यकुशल नेतृत्वाने जिल्हाधिकारी कार्यलयाच्या कारभाराला काॅर्पोरेट शिस्त लावली. वन बंधा-यापासून टाऊन हाॅलपर्यंत विविध कामे मार्गी लावली.मात्र ज्यांचे हितसंबंध धोक्यात आले त्यांनी लगेचच राजकीय दडपण आणून त्यांना हटविले. पुर्ण ठाणे जिल्ह्यातील भुमाफीया,अनधिकृत कामं करणारे लोक,खाड्या बुजवून चाळी-गोडाऊन उभारणारे,पर्यावरणाचा सत्यानाश करणारे,अवैध रेती उत्खनन करुन शासनाचा करोंडोंचा महसूल बुडवणारे,अनधिकृत केबल व्यावसायिक आदी सर्व घटकांना कायद्याचा चाप लावून त्यांचे सर्व गैर धंदे बंद पाडून सर्व सामान्यांना दिलासा देणा-या आणि ठाणे जिल्ह्यात कायद्
कार्ड क्लोनिंग कसे होते एटीएम मशीन मध्ये ज्या ठिकाणी डेबिट कार्ड आत टाकले जाते त्या ठिकाणी स्किमर बसविले जातात कार्ड आत टाकताच त्यामागील मॅग्नेटिक स्ट्रिप स्किमरमध्ये स्कॅन होते एटीएम मशीनवरील की - बोर्डच्या वरील बाजूस चुपा कॅमेरा बसविला जातो. या कॅमेरामध्ये कार्ड धारकाने दाबलेला पिन नंबर सेव्ह होतो स्किमरवर स्कॅन झालेल्या मॅग्नेटिक स्ट्रिपची भामटे तशाच प्रकारच्या अन्य स्ट्रिपवर प्रिंट आऊट काढतात आणि डुप्लिकेट कार्ड तयार करून त्याचा वापर करतात सेव्ह झालेला पिन नंबर घेऊन डुप्लिकेट कार्ड वापरेलले जाते अशा च प्रकारे दुकान,हॉटेल, मॉल, कॉफी शॉप मध्ये स्वाईप मशीनद्वारे डेटाचोरी करून डुप्लिकेट कार्ड द्वारे एटीएम सेंटर मधून तुमचे पैसे काढले जातात सायबर पोलीस सेल म्हणजे काय? २००० साली माहिती-तंत्रज्ञान आयटी कायद्याची निर्मिती झाली.त्याच वर्षी देशभरातल्या मुंबई सारख्या मोठ्या शहरांमध्ये सायबर क्राईम इन्व्हेस्टीगेशन सेल स्थापन करण्यात आले. त्यानुसार १८ डिसेंबर २००० रोजी मुंबई पोलिसांचा सायबर सेल कार्यान्वित झाला हा सेल गुन्हेशाखेच्या अंतर्गत
टिप्पण्या