काळ

जीव कासावीस होतो
माझा आठवणींच्या काळात...

का जगायचं घडून गेलेल्या
आपल्या भूतकाळात...

आपण पण मस्त जगायचं
फक्त आणि फक्त वर्तमान काळात...

तरच आपले आयुष्य चांगले
जगता येईल भविष्य काळात...

- विनायक पवार

शुभ दिपावली

एक करंजी..
आनंदाने भरलेली.. 
एक शंकरपाळी..
चौकस विचाराची.. 
एक चकली..
कीर्ती विस्तारणारी..
एक लाडू..
ऐक्याने एकवटलेला..
एक मिठाई..
मनात गोडवा भरलेली..
एक दिवा..
मांगल्य भरलेला..
एक रांगोळी..
जीवनात रंग भरणारी..
एक कंदील..
यशाची भरारी घेणारा..
एक उटणे..
जीवन सुगंधित करणारे..
एक सण..
समतोल राखणारा..

अन् एक मी..शुभेच्छा देणार...
  
" तुम्हांला आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबाला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा"

शुभ दिपावली........

"महाराष्ट्राची कुलस्वामिनी" तुळजाभवानी मंदिर पाचपाखाडी गणेशगल्ली ठाणे

        ठाणे शहर हे निसर्गसंपन्न, ऐतिहासिक आणि सांस्कृतिक दृष्टिकोनातून समृद्ध शहर आहे.ठाणे हे फक्त निवासी ठिकाण नसून ते निसर्ग,...