नमस्कार मित्रानो.. प्रतिवर्षाप्रमाणे गुढीपाडव्याच्या शुभदिनी रविवारी कळवा गावदेवी मैदान पासून हिंदू नववर्ष स्वागत यात्रा मोठ्या जल्लोषात सुरु झाली.कळवा सांस्कृतिक प्रतिष्ठान आयोजित शोभा यात्रेचे हे २१ वे वर्ष आहे. संस्थेने सर्वांना समाजप्रबोधन हा विषय दिला होता, सर्व संस्थेने विषय छान मांडला होता, साडे तीन मुहूर्तांपैकी एक म्हणजे हिंदू नववर्षाचा शुभारंभ असलेल्या गुढीपाडवा सण मुंबईसह राज्य भरात मोठ्या उत्साहात पार पडला. ढोल ताशांचा गजर, झांज अन् वेशीमच्या तालावर नटूनथटून पारंपारिक वेषात नववर्षांचे स्वागत करण्यात आले. मिरवणुका, शोभायात्रांमधून एकतेचा संदेश देणाऱ्या गुढ्या मुंबईत दारोदारी उभारण्यात आल्या.या शोभायात्रां मध्ये अनेक महिला नऊवारी, पैठणी साड्या त्यावर दागिण्यांचा साज, डोक्यावर फेटा आणि पायात कोल्हापूर चप्पल अशा एकदम मराठमोळ्या पेहरावा सहभागी झाल्या होत्या. तर आपण पण भेट देउन सर्व दाखवायचा प्रयत्न केला आहे तर वीडियो पूर्ण पहा आणि शेयर नक्की करा. युट्यूब लिंक खाली दिली आहे नक्कीच पहा https://youtu.be/Zu2fSn_osTg?si=LeaFhqME5nKqqW-A धन्यवाद. प्रसन्नतेचा साज घेवून आले ...
भाषा म्हणजे नेमकं काय, असा प्रश्न तुम्हाला कधी पडलाय? प्राणी आणि मानव, समूह करून राहतात. त्यामध्ये परस्परांशी संपर्क साधायला, एखादी गोष्ट समोरच्यापर्यंत पोहोचवायला जे माध्यम वापरलं जातं, ते माध्यम म्हणजे भाषा. त्यात अगदी हावभाव, कृती, ध्वनी या सर्वांचा समावेश होतो. भाषेचा नेमका उगम मात्र कसा झाला हे अजून पूर्णपणे स्पष्ट झालेलं नाही. आमची बोली भाषा - अहिराणी... अहिराणी भाषा ही खान्देश विभागणी बोलीभाषा शे. ही भाषा लाखो खान्देशी मानसेनि आवडनि भाषा शे.जवळपास ९५% टक्का खान्देशना लोके अहिराणी बोलतस तेसनी बोलीभाषा शे. जळगाव , धुळे, नंदुरबार, औरंगाबाद तथा नाशिका जिल्हांना काही भाग्मा अहिराणी भाषा बोलतस पारोळा, एरंडोल ,सटाणा,मालेगाव ह्या तालुकास्मा सर्व जाती जामातीसनी मायबोली भाषा शे.जळगाव,नंदुरबार,धुळे त्या नासिक बागलाण, मालेगाव तयां कळवण तालुका जिल्हांना काही विशिष्ट तालुकामा अहिराणी हीच बोलीभाषा शे .ह्यामाभी पोटभाषा शे ज्याम थोडाथोडा बदल जानवस ,जसा चाळीसगाव, मालेगाव व धुळामा वेगवेगळ्या तोनामा हि बोलीजास. अहिराणी हि भाषा हिंदी, मराठी, गुजराथी ह्या भाशासन तोडीमोसन बनेल शे . परंतु अहिराणी भाषणं...
टिप्पण्या