पोस्ट्स

मार्च, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

मनातलं मन...

इमेज
  खूप दिवसांनी ब्लॉग लिहायचा विचार चालू होता.पण फस्ट,सेंकड आणि नाईट शिप्ट असल्या कारणाने काही जमत नव्हते तसेच या तिन्ही वेळा संभाळून आपल्या व्यवसायात पण खारीचा वाटा उचलणे हेही तितकेच माझ्यासाठी खूपच महत्वाचे होते.पगार आज आला की दोन दिवसात कधी संपतो हे फक्त नोकरी करणाऱ्यांना माहीत असते.म्हणूनच वडिलांपासून मिळालेला व्यवसाय चालू असल्याने मला काही पैशांची चणचण कधीच भासली नाही.वडील नेहमीच म्हणायचे मी असो किंवा नसो या व्यवसायाकडे कधीच दुर्लक्ष करू नकोस शेवटी व्यवसाय तुला प्रत्येक अडचणीतून बाहेर काढायला नक्कीच मदत करेल.शेवटी त्यांचे बोल खरे ठरले आणि आज प्रत्यक्षात ते मी आज अनुभवतो आहे.काय त्यांची दुरदृष्टी होती मानले पाहिजे त्यांना त्यावेळी सगळे हसण्यावारी आमच्याकडून घेतले जायचे ती आमचीच मोठी चूक होती...   आज त्या गोष्टी आठवल्या की आम्हांला आमचीच लाज वाटते.ते सतत दरवर्षी मला एक डायरी नवीन वर्षानिमीत्त भेटवस्तु म्हणून देत... प्रत्येक दिवसाचा हिशेब,आज दिवस भरात आपण काय शिकलो काय नाही याची नोंद करायला लावत जेणेकरून महिन्याच्या शेवटी चर्चा करून भविष्यात ते आपण कधीच विसरून जाऊ नये हा त्या...