मनातलं मन...

  खूप दिवसांनी ब्लॉग लिहायचा विचार चालू होता.पण फस्ट,सेंकड आणि नाईट शिप्ट असल्या कारणाने काही जमत नव्हते तसेच या तिन्ही वेळा संभाळून आपल्या व्यवसायात पण खारीचा वाटा उचलणे हेही तितकेच माझ्यासाठी खूपच महत्वाचे होते.पगार आज आला की दोन दिवसात कधी संपतो हे फक्त नोकरी करणाऱ्यांना माहीत असते.म्हणूनच वडिलांपासून मिळालेला व्यवसाय चालू असल्याने मला काही पैशांची चणचण कधीच भासली नाही.वडील नेहमीच म्हणायचे मी असो किंवा नसो या व्यवसायाकडे कधीच दुर्लक्ष करू नकोस शेवटी व्यवसाय तुला प्रत्येक अडचणीतून बाहेर काढायला नक्कीच मदत करेल.शेवटी त्यांचे बोल खरे ठरले आणि आज प्रत्यक्षात ते मी आज अनुभवतो आहे.काय त्यांची दुरदृष्टी होती मानले पाहिजे त्यांना त्यावेळी सगळे हसण्यावारी आमच्याकडून घेतले जायचे ती आमचीच मोठी चूक होती...
  आज त्या गोष्टी आठवल्या की आम्हांला आमचीच लाज वाटते.ते सतत दरवर्षी मला एक डायरी नवीन वर्षानिमीत्त भेटवस्तु म्हणून देत...
प्रत्येक दिवसाचा हिशेब,आज दिवस भरात आपण काय शिकलो काय नाही याची नोंद करायला लावत जेणेकरून महिन्याच्या शेवटी चर्चा करून भविष्यात ते आपण कधीच विसरून जाऊ नये हा त्यांचा अट्टाहास असे त्यावेळी ते गाणे होते की नव्हते की माहीत नाही "दंगल" या चित्रपटातील गाणे नक्कीच फिट बसले असते "बापू सेहत के लिए तू तो हानीकारक है "असो पण आजपण मी न चुकता प्रत्येक महिन्यात डायरी मेनटेन करतो जेणेकरून मला माझा खर्च कन्ट्रोल मध्ये आणण्यासाठी खरंच खूप मदत होते...  
  चला आता बस जास्त काही लिहीत नाही.अधूनमधून आपली भेट होईलच "मनातलं मन" कोणीतरी म्हटले आहे "शार्ट स्पिच" लोक आवडीने वाचतात जास्त लिहिले की कंटाळा येतो वाचायचा बरोबर ना...

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

गणपती बाप्पा मोरया...

मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा...

त्या आठवणी...

सहज सुचली म्हणून....

आमची बोली भाषा - अहिराणी

मोठे रॅकेट...

एक नाणे आणि दोन बाजू...

बॅड पॅच

Good News - Voters